शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

अहवाल निगेटिव्ह: कोरोनाग्रस्त इराणमधून आलेल्या युवकावर उपचार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 17:12 IST

खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा शासकिय रूग्णालयातील कोरोना विलगीकरण कक्षात उपचारासाठी दाखल केले; मात्र त्याच्या स्त्रावच्या चाचणीचा अहवाल मंगळवारी (दि.३) निगेटिव्ह प्राप्त झाला, त्यामुळे चिंतेचे कारण नाही

ठळक मुद्देनमुने पुणे येथील प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आलेअहवाल मंगळवारी (दि.३) निगेटिव्ह प्राप्त झाला

नाशिक : कोरोनाग्रस्त देश इराणमध्ये नोकरीस असलेला मुळचा लेखानगर सिडको भागातील एका व्यक्तीला सर्दी, थकव्याचा त्रास अचानकपणे जाणवू लागल्याने त्यास जिल्हा रूग्णालयातील कोरोना विषाणू आजार विलगीकरण कक्षात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. त्याच्या घशातील स्त्रावचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले. या नमुन्यांच्या चाचणीचा निगेटिव्ह अहवाल जिल्हा शल्यचिकित्सकांना प्राप्त झाला आहे. यामुळे नाशिककरांनी घाबरून न जाता सावधगिरी बाळगावी, असे आवाहन वैद्यकिय सुत्रांकडून करण्यात आले आहे.दोन दिवसांपुर्वी इटलीमधून मुळ चंद्रपूरचा असलेला मात्र आपल्या बहिणीकडे नाशकात भेटण्यसाठी आलेल्या अशाच एका कोरोनाग्रस्त देशातील रुग्ण जिल्हा शासकिय रूग्णालयात उपचारार्थ दाखल झाला होता. त्याच्याही घशातील स्त्रावचे नमुने घेऊन पुण्यात प्रयोगशाळेला पाठविले गेले होते. या रुग्णाचाही अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाल्याने सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला. दोन दिवसानंतर पुन्हा इराणसारख्या कोरोनाग्रस्त देशातून मुळचा नाशिकचा असलेला रुग्ण शहरात आल्याने त्यास त्रास जाणवू लागला. त्यामुळे तत्काळ त्याला सोमवारी (दि.२) जिल्हा शासकिय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्याला सर्दी, खोकल्याचा त्रास उद्भवला होता. साधारणत:तीशीचा हा तरूण २५ फेब्रुवारी रोजी नाशकात त्याच्या निवासस्थानी आला होता. त्याच्यासोबत त्याचे अन्य दोन मित्रदेखील नाशकात वेगवेगळ्या परिसरात राहत्या घरी आले होते. या तीघांची स्क्रिनिंग मनपा आरोग्य विभागाकडून करण्यात आली. त्यापैकी एका रूग्णाला सर्दी, खोकल्याचा त्रास सोमवारपासून उद्भवल्याने त्यास खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा शासकिय रूग्णालयातील कोरोना विलगीकरण कक्षात उपचारासाठी दाखल केले; मात्र त्याच्या स्त्रावच्या चाचणीचा अहवाल मंगळवारी (दि.३) निगेटिव्ह प्राप्त झाला, त्यामुळे चिंतेचे कारण नाही, मात्र नागरिकांनी सर्दी,खोकला, थकवा, ताप यांसारख्या आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नये, असे आवाहनही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोनाIranइराणNashikनाशिकHealthआरोग्य