लोकमत न्यूज नेटवर्कयेवला : येवला तालुक्यातील चार संशयित रूग्णांचे अहवाल बुधवारी (दि. १) पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान, नाशिक रूग्णालयातून दोन बाधित रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.तालुक्यातील १९ संशयित रूग्णांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी ३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून १६ निगेटीव्ह आले आहेत. याबरोबरच जिल्हा रूग्णालयाकडून एका संशयिताचा अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. यात मातुलठाण शहरातील पाबळे गल्ली, पिंजारगल्ली येथील पुरूष तर पहाडगल्लीतील महिला रूग्णांचा समावेश आहे.तालुक्यातील एकूण बाधित रु ग्ण संख्या १३७ झाली असून आतापर्यंत १०१ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तालुक्यातील कोरोना बळींची संख्या १० झाली आहे. बाधितांपैकी नगरसूल येथील डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटरला १६, नाशिक येथील रूग्णालयात ९ तर बाभुळगाव येथील संस्थात्मक विलगीकरण केंद्रात एका रूग्णावर उपचार सुरू असल्याची माहिती ग्रामीण उपजिल्हा रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक डॉ. शैलजा कुप्पास्वामी यांनी दिली.
येवल्यातील चौघांचा अहवाल पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 23:03 IST
येवला : येवला तालुक्यातील चार संशयित रूग्णांचे अहवाल बुधवारी (दि. १) पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान, नाशिक रूग्णालयातून दोन बाधित रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
येवल्यातील चौघांचा अहवाल पॉझिटिव्ह
ठळक मुद्देतालुक्यातील एकूण बाधित रु ग्ण संख्या १३७