मनपाच्या आगीच्या चौकशी समितीचा अहवाल आज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:42 IST2021-02-05T05:42:18+5:302021-02-05T05:42:18+5:30
गेल्या शुक्रवारी (दि. २२) महापालिकेच्या राजीव गांधी भवनातील शिवसेना गटनेता आणि विरोधी पक्ष नेत्यांच्या केबिनलगत असलेल्या कक्षात आग लागली ...

मनपाच्या आगीच्या चौकशी समितीचा अहवाल आज
गेल्या शुक्रवारी (दि. २२) महापालिकेच्या राजीव गांधी भवनातील शिवसेना गटनेता आणि विरोधी पक्ष नेत्यांच्या केबिनलगत असलेल्या कक्षात आग लागली होती. याठिकाणी पेस्ट कंट्रोलचे काम करण्यासाठी पाच ते सहा कर्मचारी आले होते. त्यांनी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना बाहेर जाऊन किमान तीन तास तरी केबिनचा वापर करता येणार नाही, असे सांगितले. त्यानंतर भंडाराप्रमाणे होणाऱ्या कक्षाचा वापर होत असलेल्या ठिकाणी आधी स्वच्छतेचे काम करण्यासाठी व्हॅक्युम क्लीनर सुरू करण्यात आले. त्यावेळी स्विच बोर्डातून ठिणग्या उडून ही आग लागली, असे सांगण्यात आले. अग्निशमन दलाने वेळीच आग आटोक्यात आणली असली तरी घटनेची गंभीर दखल घेऊन आयुक्त कैलास जाधव यांनी चौकशी समिती नियुक्त केली आहे. यात शहर अभियंता संजय घुगे, अधीक्षक अभियंता शिवाजी चव्हाणके आणि अग्निशमन दलाचे प्रमुख संजय बैरागी यांचा समावेश असून, तीन दिवसांत त्यांना अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले हेाते. मात्र, शनिवार, रविवार तसेच मंगळवार असे तीन दिवस सार्वजनिक सुट्या आल्याने चौकशीचे कामकाज पूर्ण झालेले नाही. प्राथमिक बैठक झाली असली तरी आता गुरुवारी (दि. २८) प्रत्यक्षदर्शींचे जबाब घेऊन मग अहवाल पूर्ण केला जाणार असून, तो उद्याच आयुक्तांना दिला जाण्याची शक्यता होती.