बांधकाम व्यावसायिकाच्या विरोधात अधिकाऱ्यांना निवेदन

By Admin | Updated: June 20, 2014 01:19 IST2014-06-20T00:37:20+5:302014-06-20T01:19:38+5:30

वणी : हाउसेस विक्री करण्यापूर्वी मूलभूत सुविधा पुरविण्याची जबाबदारी संबंधित व्यावसायिकांनी टाळल्याने या विरोधात जिल्हाधिकारी, तहसीलदार व ग्रामपालिका संस्थाकडे दाद मागितली आहे.

Report to the authorities against the builder | बांधकाम व्यावसायिकाच्या विरोधात अधिकाऱ्यांना निवेदन

बांधकाम व्यावसायिकाच्या विरोधात अधिकाऱ्यांना निवेदन

वणी : हाउसेस विक्री करण्यापूर्वी या ठिकाणी मूलभूत सेवा व सुविधा पुरविण्याची जबाबदारी संबंधित व्यावसायिकांनी टाळल्याने संख्येश्वरनगर परिसरातील नागरिकांनी या विरोधात जिल्हाधिकारी, तहसीलदार व ग्रामपालिका संस्थाकडे निवेदनाद्वारे दाद मागितली आहे.
संख्येश्वर मंदिर परिसरात संख्येश्वरनगर निर्माण झाले असून, गेल्या दोन वर्षांपासून याठिकाणी अनेक नागरिकांनी रोहाउसेस खरेदी केलेले आहेत. मात्र दोन वर्षांचा कालावधी उलटूनही याठिकाणी येण्या जाण्यासाठी रस्ता नाही, स्ट्रीटलाईटची सुविधा नाही. सांडपाण्याची व्यवस्था नाही. ओपन स्पेस, ग्राऊंड नाही, बांधकाम नियमाप्रमाणे नाही. पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही अशा बाबींची पूर्तता न झाल्याने त्या विरोधात तक्रार करण्यात आली आहे.
वणी परिसरात अपार्टमेंटस्, रो-हाउसेस, बंगलेवजा इमारती या झाल्या आहेत. नगर, कॉलनी अशी गोंडस नावांना भुलून अनेकांनी या ठिकाणी हक्काची वास्तू खरेदी करण्यासाठी लाखो रुपये मोजले आहेत. मात्र आज वसलेली नगरे व कॉलन्या आजही मूलभूत सुविधांपासून वंचित असून, आपल्या मागण्यांसाठी ते बिल्डरचे उंबरठे झिजवत आहेत. काही ठिकाणी प्रशासकीय जागांचा गैरवापर, काही ठिकाणी अस्तित्वात नसलेल्या जागांची खरेदी असे प्रकार घडल्याची वंदता असून, प्रशासकीय अधिकारी व बिल्डरच्या साट्या लोट्यामुळे आजही वणी परिसरातील नागरिक लाखो रुपये मोजूनही मूलभूत सुविधांपासून आहेत. (वार्ताहर)
दिंडी सोहळयाची जय्यत तयारी
कसबेसुकेणे : सुकेणे ते पंढरपूर आषाढी एकादशी दिंडी सोहळयाची तयारी पुर्णत्वास गेली असुन येत्या शनिवारी सकाळी प्रस्थान ठेवले असल्याची माहिती, महंत खापरे महाराज व जेष्ठ वारकरी आण्णासाहेब गंगाधर मोगल यांनी दिली. कसबे सुकेणे व मौजे सुकेणे येथील संयुक्त पंढरपुर दिंडी सोहळयाचे प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही आयोजन करण्यात आले असुन यंदा दोनशेच्या वर वारकरी या दिंडीत सहभागी होणार आहे. सुकेणेहुन वावी, कोल्हार, राहुरी, नगर, मिरजगाव, करमाळा, पंढरपुर असा दिंडी सोहळयाचा मार्ग राहणार असुन कसबे सुकेणे , मौेजे सुकेणेसह या मार्गावरील दानशुर भाविकांनी दिंडी सोहळयाची मुक्कामाची तसेच भोजनाची व्यवस्था केली आहे.

Web Title: Report to the authorities against the builder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.