कळवण उपनगराध्यक्षपदी अनुराधा पगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 01:51 IST2020-07-29T21:57:43+5:302020-07-30T01:51:40+5:30
कळवण : नगरपंचायतच्या उपनगराध्यक्षपदी महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनुराधा जितेंद्र पगार यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बुधवारी बिनविरोध निवड झाली.

कळवण नगरपंचायतच्या उपनगराध्यक्षपदी अनुराधा पगार यांच्या निवडीप्रसंगी नगराध्यक्ष रोहिणी महाले, कौतिक पगार, भावराव पगार, जयेश पगार, जितेंद्र पगार, अतुल पगार, टिनू पगार, भाऊसाहेब पवार, नितीन पगार, प्रदीप पगार, नितीन बच्छाव आदी.
लोकमत न्यूज नेटवर्क
कळवण : नगरपंचायतच्या उपनगराध्यक्षपदी महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनुराधा जितेंद्र पगार यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बुधवारी बिनविरोध निवड झाली.
उपनगराध्यक्षपदासाठी सौ. पगार यांचे एकमेव नामनिर्देशनपत्र दाखल झाल्यामुळे बिनविरोध निवड झाली. कळवण नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष अतुल पगार यांनी उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी बी.ए. कापसे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रभारी मुख्याधिकारी सचिन गोळे यांच्या उपस्थित निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक पार पडली. नगरपंचायतवर आमदार नितीन पवार, गटनेते कौतिक पगार यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीची एकहाती सत्ता असून, परंपरेनुसार उपनगराध्यक्षपदाची निवड बिनविरोध झाली. सौ. पगार ह्या कळवणच्या १०व्या उपनगराध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष जितेंद्र पगार यांच्या पत्नी असून, कळवण बाजार समितीच्या संचालिका आहेत.
निवडणूक निर्णय अधिकारी बी. ए.कापसे यांच्याकडे उप- नगराध्यक्षपदासाठी सौ. अनुराधा पगार यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. सकाळी १० वाजता निवड प्रक्रियेला सुरुवात झाली. त्यानंतर उमेदवारी अर्जाची छाननी, माघार आणि निकाल असा नियमानुसार लिखित कार्यक्रम संपन्न होऊन एकमेव नामनिर्देशन दाखल झाल्यामुळे उपनगराध्यक्षपदी अनुराधा पगार यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा यावेळी करण्यात आली.एकमेव नामनिर्देशन अर्ज आल्याने निवडउपनगराध्यक्ष अतुल पगार यांनी पदाचा राजीमाना दिला तेव्हापासून हे पद रिक्त असल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये निवडणूक कार्यक्र म जाहीर केला आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणाºया या बैठकीत उपनगराध्यक्ष पदासाठी सौ. अनुराधा जितेंद्र पगार यांनी एकमेव नामनिर्देशन पत्र दाखल केले. नामनिर्देशन पत्रावर सूचक म्हणून गटनेते कौतिक पगार तर अनुमोदन म्हणून साहेबराव पगार यांची स्वाक्षरी आहे.