ओझरटाऊनशिप : ओझर येथे शनिवारी ७७ रुग्ण कोरोना बाधित आढळुन आले ओझर सह परिसरात आता पर्यत कोरोनाचे रुग्ण संख्येत रोज झपाट्याने मोठी वाढ होत आहे.ओझर सह परिसरातील ७७ रुग्णाचा अहवाल शनिवारी (दि.१७) कोरोना बाधित आला आहे, त्यामुळे आता ओझरसह परिसरातील कोरोना बाधित रुग्ण संख्या एकुण ३०६५ झाली आहे. त्या पैकी ६५ बाधीतांचा मृत्यू झाला. २२६५ रुग्ण बरे झाले असुन ७३५ रुग्णावर उपचार सुरू आहे, पैकी ८० रुग्णावर रूग्णालयात उपचार सुरू असुन ६५५ रुग्ण घरीच कॉरंटाईन होऊन उपचार घेत आहेत परिसरातील एकुण कंटेन्मेंट झोन संख्या १५५६ झाली असुन ८०७ झोन पूर्ण झाले तर ॲक्टिव्ह झोन ७४९ आहेत अशी माहिती आरोग्य विभागाने दिली. ओझरसह परिसरामध्ये आता पुन्हा रोज नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळत असल्याने बाधितांच्या संख्येत झपाट्याने मोठी वाढ होत आहे बाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना तपासणी करुन घ्यावी गरिकांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काळजी घ्यावी. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी नियमांचे पालन करावे सर्वानी मास्क,सँनिटाईझर , सोशल डिस्टशनिंगचा नियमित वापर करावा असे आवाहन आरोग्य विभागातर्फे आरोग्य अधिकारी डाँ.वैशाली कदम ,डाँ. अक्षय तारगे, आरोग्य सहाय्यक अनिल राठी यांनी केले आहे.
ओझर सह परिसरातील ७७ रुग्णाचा अहवाल शनिवारी कोरोना बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 00:04 IST
ओझरटाऊनशिप : ओझर येथे शनिवारी ७७ रुग्ण कोरोना बाधित आढळुन आले ओझर सह परिसरात आता पर्यत कोरोनाचे रुग्ण संख्येत रोज झपाट्याने मोठी वाढ होत आहे.
ओझर सह परिसरातील ७७ रुग्णाचा अहवाल शनिवारी कोरोना बाधित
ठळक मुद्देपरिसरातील कोरोना बाधित रुग्ण संख्या एकुण ३०६५ झाली