सुखदेव बनकर यांची बदली

By Admin | Updated: November 17, 2015 23:54 IST2015-11-17T23:53:23+5:302015-11-17T23:54:37+5:30

शंभरकर नवे सीईओ

Replacing Sukhdev Baker | सुखदेव बनकर यांची बदली

सुखदेव बनकर यांची बदली



नाशिक : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांची बदली झाली असून, त्यांच्या जागी मुंबईचे अतिरिक्त जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी सिंहस्थ कुंभमेळ्याचे निमित्त करून सर्वपक्षीय सदस्यांनी बनकर यांची बदली रद्द करून आणली होती; मात्र आता कुंभमेळा संपताच त्यांच्या बदलीवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
सुखदेव बनकर यांना नाशिक जिल्हा परिषदेची सूत्रे हातात घेऊन आॅक्टोबर महिन्यात दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. तथापि, त्यांची मंगळवारी बदली करण्यात आली आहे. यापूर्वी जानेवारी महिन्यात बनकर यांची अशाच प्रकारे बदली झाली, तेव्हा सर्वपक्षीय सदस्यांनी विरोध केला होता. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन बनकर यांची बदली रद्द करून घेण्यात आली होती. कुंभमेळा तोंडावर असल्याने अनेक महत्त्वाची कामे करायची असल्याने बनकर यांची बदली रद्द करावी, अशी मागणी करण्यात आली होती. ती मान्य झाली होती. परंतु कुंभमेळा होताच पुन्हा एकदा त्यांच्या बदलीचे आदेश निघाले आहेत. माजी मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे शासकीय स्वीय सहायक म्हणून त्यांनी काम केले होते. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वपक्षीय सदस्यांची अधिक जवळीकही निर्माण झाली होती.
दरम्यान , राज्य शासनाने आज पाच सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. पीयूष सिंग हे सामाजिक न्याय विभागाचे (पुणे) नवे आयुक्त असतील. आतापर्यंत ते राजीव गांधी जीवनदायी योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते.

Web Title: Replacing Sukhdev Baker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.