गोणीतील कांदा पुन्हा चाळीत

By Admin | Updated: July 29, 2016 22:28 IST2016-07-29T22:22:39+5:302016-07-29T22:28:34+5:30

गोणीतील कांदा पुन्हा चाळीत

Repeat the onion in the pan | गोणीतील कांदा पुन्हा चाळीत

गोणीतील कांदा पुन्हा चाळीत

 नांदगाव : शेतकऱ्यांच्या दबावामुळे नऊ ट्रॅक्टर परतनांदगाव : प्रचलित पद्धतीने कांदा खरेदी करावा अशी मागणी शेतकरी करत आहेत, तर गोणीत कांदा आणला तरच लिलाव खरेदी करू असा व्यापारी वर्गाचा आग्रह. हा तिढा कायम असताना बाजार समितीमध्ये गोणीत कांदा भरून विक्रीसाठी आणलेल्या शेतकऱ्यांना इतर शेतकऱ्यांच्या दबावापुढे माघार घेऊन तो परत न्यावा लागला.
बाजार समितीमध्ये सभापती तेज कवडे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांनी जोरकस पद्धतीने खुल्या कांदा लिलावाची मागणी केल्याने काही काळ वातावरण तापले होते. गोण्यांमध्ये भरलेला नऊ ट्रॅक्टर्स कांदा आज विक्रीसाठी आणला होता.
माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश बोरसे यांनी गोणीत कांदा आणलेल्या शेतकऱ्याचा किस्सा सांगितला. २५ गोण्या कांदा पाच व्यापाऱ्यांनी खरेदी केला व प्रत्येकाच्या खळ्यावर तो पोहोचविताना त्या शेतकऱ्याची कशी दमछाक झाली हा अनुभव सांगितला.
सभापती तेज कवडे यांनी एका प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले की, गोणी पद्धतीसाठी बाजार समितीमध्ये काही सुधारणा करणे गरजेचे आहे.
संचालक भास्कर कासार, बाबासाहेब साठे, किरण देवरे, रमेश बोरसे, सुभाष कुटे, संजय सुरसे, अतुल पाटील, देवदत्त सोनवणे, संदीप बोरसे आदि शेतकरी चर्चेत सहभागी झाले होते.
जिल्हा स्तरावरील व्यापारी असोसिएशनच्या निर्णयाप्रमाणे गोणी कांदा खरेदी करावयास येथील व्यापारी तयार असल्याचे पत्र बाजार समितीला देण्यात आले. अध्यक्ष सचिन पारख, सुमेर कासलीवाल, संदीप फोफलिया, समीर
कासलीवाल नंदन करवा, संदीप खैरनार, सोमनाथ घोंगाणे यांनी सदर निर्णय घेऊन बाजार समितीला कळवले आहे.
दरम्यान, बाजार समितीने जाहीर फलकाद्वारे केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत दोन तीन दिवस गोणीबंद कांद्याचे लिलाव झाले होते. मात्र आज गोणीस विरोध करण्यासाठी अधिक संख्येने आलेल्या शेतकऱ्यांच्या आग्रही भूमिकेमुळे वांधा झाला. व्यापारी लिलावासाठी आले नाहीत. दरम्यान, खुल्या पद्धतीने कांदा खरेदी करण्यात यावा या आशयाचे निवेदन सभापती तेज कवडे व सचिव अमोल खैरनार यांना देण्यात आले. (वार्ताहर)

Web Title: Repeat the onion in the pan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.