शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

सटाणा, मनमाड येथे रिपाइंतर्फे मोर्चे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 01:48 IST

संविधानाची प्रत जाळल्याच्या निषेधार्थ व सनातनी आरोपींना शासनाने त्वरित पकडून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (अ) बागलाण तालुक्याच्या वतीने तहसीलदार जितेंद्र कुंवर यांना निवेदन सादर करण्यात आले.

सटाणा : संविधानाची प्रत जाळल्याच्या निषेधार्थ व सनातनी आरोपींना शासनाने त्वरित पकडून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (अ) बागलाण तालुक्याच्या वतीने तहसीलदार जितेंद्र कुंवर यांना निवेदन सादर करण्यात आले.  दिल्ली येथे दि.९ रोजी काही सनातन विद्रोही समाजकंटकांनी भारतीय संविधानाची प्रत जाळून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरुद्ध केलेली घोषणाबाजी मानव जातीला काळिमा फासणारी आहे. या घटना शासनाच्या हलगर्जीपणामुळे घडत असून हे प्रकार असेच चालू राहिले तर पक्षाच्यावतीने आंदोलनाचे पाऊल उचलण्यात येईल, असे निवेदनात म्हटले आहे. याप्रसंगी पक्षाचे सरचिटणीस किशोर सोनवणे, तालुकाध्यक्ष बापुराज खरे, जिभाऊ अहिरे, देवा गांगुर्डे, बापू पवार, दादा खैरनार, विनायक खरे, राजू भामरे, जगदीश भामरे, यशवंत अहिरे, यशवंत भामरे, सुरेश पवार, राहुल खरे, रमेश व्यापार, सुरेश पवार, भाऊसाहेब उशीर, रमेश वाघ, प्रदीप सोनवणे, अशोक खरे, दत्तू खरे, सुनील भामरे, अप्पा बोराळे व कार्यकर्ते उपस्थित होते.  मनमाड : दिल्ली येथे संविधान जाळून प्रक्षोभक भाषण करण्याच्या घटनेचे तीव्र पडसाद मनमाड शहरात उमटले. मनमाड शहर रिपाइंच्या वतीने शहरातून निषेध मोर्चा काढण्यात आला. संविधानाची प्रत जळणाऱ्या श्रीनिवास पांडे याच्या प्रतीकात्मक पुतळ्याला भर चौकात फाशी देऊन निषेध व्यक्त करण्यात आला.  रिपाइंचे जिल्हा संपर्कप्रमुख राजेंद्र अहिरे, कार्याध्यक्ष गंगाभाऊ त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली येथील रिपाइं भवनपासून मोर्चाला प्रारंभ झाला. महात्मा गांधी पुतळा, शिवाजी महाराज पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा मार्गे निषेधाच्या घोषणा देत निघालेला मोर्चा एकात्मता चौकात पोहोचला. येथे पांडे याच्या प्रतीकात्मक पुतळ्याला भर चौकात फाशी देऊन मनुस्मृतीचे दहन करण्यात आले. विविध पक्ष व संघटना पदाधिकाºयांनी उपस्थित राहून या आंदोलनाला पाठिंबा दिला. यावेळी तालुकाध्यक्ष कैलास अ हिरे, शहराध्यक्ष दिलीप नरवडे, पी. आर. निळे, दिनकर धिवर, सुरेश शिंदे, रु पेश अहिरे, गुरु कुमार निकाळे, मोझेस साळवे, महेंद्र वाघ, पुष्पलता मोरे, अरु णा जाधव, मंगल सोनवणे, बबनबाई वाघ, यशवंत बागुल,योगेश बोदडे, लक्ष्मण धिवर, राजेंद्र ढेंगे, रवींद्र घोडेस्वार, फिरोज शेख, अहमद बेग, वाल्मीक आंधळे, सुनील साळवे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.लाल सेनेच्या वतीने निषेधमनमाड : दिल्ली येथे संविधान प्रत जाळल्याच्या निषेधार्थ मनमाड येथे लाल सेनेच्या वतीने निषेध करण्यात आला.. संविधान प्रत जळण्याचे हीन कृत्य करणार्या समाज कंटकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. संघटनेच्या वतीने पोलीस निरीक्षक सुरेशकुमार घुसर यांना निवेदन देण्यात आले. या वेळी संघटनेचे उ महाराष्ट्र अध्यक्ष जितेंद्र गायकवाड, सरचिटणीस संदीप कांबळे, तालुकाध्यक्ष प्रकाश खैरनार, प्रकाश खंडांगळे, राजू नविगरे, कैलास नविगरे, अक्षय पगारे, नाना धगटे, रवी खैरनार, आनंद पगारे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Morchaमोर्चा