शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
"तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

कालव्यांच्या सर्वेक्षणासह दुरुस्ती करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 12:21 AM

जलसंपदा विभागाच्या यंत्रणेला आवर्तन नियोजन व कालव्याच्या दुरु स्तीचे सर्वेक्षण करून दुरुस्ती करण्याचे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले.

ठळक मुद्देमंत्रालयात बैठक : कालवा सल्लागार समिती

कळवण : जलसंपदा विभागाच्या यंत्रणेला आवर्तन नियोजन व कालव्याच्या दुरु स्तीचे सर्वेक्षण करून दुरुस्ती करण्याचे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले.नाशिक जिल्हा रब्बी व उन्हाळा हंगाम कालवा सल्लागार समितीची बैठक नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात संपन्न झाली. यावेळी अर्जुनसागर (पुनंद) व चणकापूर प्रकल्प यावर्षी पूर्ण क्षमतेने भरले आहेत. सन २०१९-२० च्या रब्बी हंगामात अर्जुनसागर (पुनंद) प्रकल्पातून कालव्यांना रब्बीसाठी किमान एक व उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी किमान तीन आवर्तने आरक्षित करावीत व कळवण तालुक्यातील कालव्याचे सर्वेक्षण करून तात्काळ दुरु स्ती करावी, अशी मागणी आमदार नितीन पवार यांनी केली. यावेळी छगन भुजबळ यांना कळवण व सुरगाणा तालुक्यातील सिंचन प्रश्नासंदर्भातील निर्माण झालेल्या अडचणी व विविध मागण्यांचे निवेदन आमदार पवार यांनी दिले. चणकापूर प्रकल्प, गिरणा डाव्या व उजव्या कालव्यास रब्बी हंगामात एक आवर्तनाचे नियोजन आहे. तसेच सिंचन व बिगरसिंचन आवर्तन एकत्रितपणे नियोजन करून होणाऱ्या बचतीतून मर्यादित क्षेत्रासाठी उन्हाळ्यात आवर्तन देण्याचे निर्देश भुजबळ यांनी बैठकीत दिले. यावेळी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीसह जलसंपदाचे मुख्य अभियंता किरण कुलकर्णी, अधीक्षक अभियंता अलका आहेरराव व अधिकारी उपस्थित होते. नाशिक जिल्ह्यातील रब्बी व उन्हाळा हंगामासाठी सिंचन व बिगरसिंचन आवर्तनासाठी पाण्याचा दुरूपयोग होणार नाही याकडे लक्ष देऊन सिंचन आवर्तनाचे योग्य नियोजन करावे, असे निर्देश भुजबळ यांनी बैठकीत दिले. यावेळी कृषिमंत्री दादा भुसे यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभाग