Repair damaged roads first | खराब केलेले रस्ते आधी दुरुस्त करा

 सिन्नर तहसील कार्यालयात समृध्दी व सिन्नर-शिर्डी महामार्गाच्या कामामुळे शेतकºयांना येणाºया अडचणीसंदर्भात आयोजित बैठकीस उपस्थित आमदार माणिकराव कोकाटे, प्रांताधिकारी डॉ. अर्चना पठारे, तहसीलदार राहुल कोकाटे, ए. के. पाटील, दिलीप पाटील, श्रावण कुमार यांच्यासह

सिन्नर: तालुक्यात सुरु असलेल्या मुंबई-पुणे समृध्दी महामार्ग आणि सिन्नर-शिर्डी महामार्ग या दोन रस्त्यांच्या कामासाठी ठेकेदारांकडून मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक सुरु आहे. या वाहतुकीमुळे तालुक्यातील अनेक रस्त्यांची वाट लागली आहे. या खराब झालेल्या रस्त्यांची पंधरा दिवसांत ठेकेदाराने दुरुस्ती करुन न दिल्यास महामार्गाच्या कामासाठी सुरु असलेली अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्याचा इशारा आमदार माणिकराव कोकाटे यांनी दिला.
समृध्दी व सिन्नर-शिर्डी महार्गाच्या कामांमुळे तालुक्यातील रस्त्यांची वाताहात झाली असून महामार्गाच्या कामामुळे शेतकऱ्यांसमोर अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर या दोन्ही प्रकल्पाचे संबंधित अधिकारी, ठेकदार व शेतकऱ्यांची तहसील कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आमदार कोकाटे यांनी जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम व शिवार रस्त्यांच्या दूरावस्थेबद्दल नाराजी व्यक्त करुन रस्त्यांची दुरुस्ती करण्याच्या सूचना संबंधित दोन्ही प्रकल्पाच्या ठेकेदार व अधिकाºयांना दिल्या.
प्रांताधिकारी डॉ. अर्चना पठारे, तहसीलदार राहुल कोताडे, न्हायचे तांत्रिक प्रबंधक दिलीप पाटील, सिन्नर-शिर्डी महामार्गाच्या मॉटोकॉर्लो कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक श्रावण कुमार, गटविकास अधिकारी एम. बी. मुरकुटे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता ए. के. पाटील यांच्यासह दोन्ही महामार्गाच्या प्रकल्याचे अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
महामार्गाच्या कामासाठी शेतकºयांची जेवढी जमिन अधिगृहीत केली आहे तेवढीच जमिन घ्या, शेतकºयांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेण्याची सूचना कोकाटे यांनी केली.
महामार्गाच्या कामासाठी ७० टन ढंपर किंवा अवजड वाहतूक केली जाते. मुरुम, दगड, वाळू वाहतूक केली जाते. या अवजड वाहतुकीने रस्त्यांची दूरावस्था झाली असून त्याची तातडीने दुरुस्ती करण्याच्या सूचना कोकाटे यांनी दिल्या. त्यासाठी १५ आॅक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली. त्यानंतर शेतकºयांना सोबत घेऊन महामार्गाचे काम व वाहतूक करणाºया गाड्या बंद केल्या जातील असे कोकाटे यांनी सांगितले. या दोन्ही महामार्गाच्या कामामुळे तालुक्यातील एकही रस्ता चांगला राहिला नसल्याबद्दल कोकाटे यांनी नाराजी व्यक्त केली. जे रस्ते पूर्वी डांबरीकरणाचे होते ते केवळ मुरुम टाकून दुरुस्त करु नका तर त्यावर डांबरीकरण करण्याची सूचना त्यांनी संबंधित कंपनीच्या ठेकेदारांना केल्या. नादुरुस्त झालेल्या सर्व रस्त्यांचे तलाठी व मंडळ अधिकाºयांनी पंचनामे करण्याची सूचना कोकाटे यांनी केली.
महामार्गाच्या कामासाठी गौण खनिज वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरु असून त्याचा महसूल भरला जातो का? आतापर्यंत किती महसूल भरला गेला याचा कोकाटे यांनी आढावा घेतला. महसूल अधिकाºयांनी या महामार्गाच्या ठेकेदाराकडून सर्व रॉयल्टी वसूल करावी अशी सूचना त्यांनी केली.

महामार्गाला विरोध नाही पण तालुक्याचे दळणवळण खराब केले
समृध्दी व सिन्नर-शिर्डी महामार्गाच्या कामाला विरोध नाही. मात्र त्याने शेतकºयांना व दळणवळणाला त्रास होत असेल तर ते सहन केले जाणार नाही असे कोकाटे यांनी सांगितले. दोन्ही रस्ते बंदिस्त (कंपाऊंड) असल्याने येथील जनतेला त्याचा फारसा उपयोग होणार नसल्याचे ते म्हणाले.

शेतकºयांच्या समस्यांचा पाऊस
सिन्नर-शिर्डी महामार्गाच्या चौपदरीकरण करतांना होणाºया अडचणीसंदर्भात शेतकºयांनी अक्षरक्ष: समस्यांचा पाऊस पाडला. जमिन अधिग्रहण मोबदला, वृक्षतोड, शेतकºयांच्या हद्दीत अतिक्रमण, हॉटेल व घरांच्या बदल्यात कमी मिळणारा मोबदला, व्यवसाय पुनर्वसन आदिंसह विविध समस्या शेतकरी व सिन्नर-शिर्डी महमहार्गामुळे बाधित होणाºया शेतकºयांनी मांडल्या.
 

Web Title: Repair damaged roads first

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.