शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
5
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
6
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
7
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
8
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
9
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
10
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
11
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
12
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
13
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
14
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
15
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
16
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
17
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
18
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
19
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा

ढासळलेले वाडे दुरुस्तीस परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 01:45 IST

एकीकडे पावसामुळे गावठाणातील जुने वाडे दिवसागणिक पडत असताना आता त्यांना आणि रहिवाशांना वाचविण्यासाठी वाडे दुरुस्तीस परवानगी देण्याचा निर्णय मंगळवारी (दि.२०) झालेल्या महासभेत घेण्यात आला. त्यामुळे गावठाणातील मूळ नाशिककरांची मोठी अडचण दूर होणार आहे.

ठळक मुद्देमहापौरांचे आदेश : शहरातील ‘बेपत्ता’ नाल्यांचा अहवाल पुढील महासभेत

नाशिक : एकीकडे पावसामुळे गावठाणातील जुने वाडे दिवसागणिक पडत असताना आता त्यांना आणि रहिवाशांना वाचविण्यासाठी वाडे दुरुस्तीस परवानगी देण्याचा निर्णय मंगळवारी (दि.२०) झालेल्या महासभेत घेण्यात आला. त्यामुळे गावठाणातील मूळ नाशिककरांची मोठी अडचण दूर होणार आहे. दरम्यान, शहरातील नाले विकासकांनी गीळंकृत करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. परंतु शहरात अवघे तीन नैसर्गिक नालेच मूळ प्रवाहात वाहत असल्याचा धक्कादायक प्रकारदेखील उघडकीस आला. यामुळे पुढील महासभेत यासंदर्भातील सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.महापालिकेची महासभा मंगळवारी (दि.२०) महापौर रंजना भानसी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी शहरात ४ आॅगस्ट रोजी अतिवृष्टीमुळे तसेच गंगापूर धरणातील विसर्गामुळे आलेल्या महापुरावर सुमारे तीन ते चार तास चर्चा करण्यात आली. त्यानंतर महापौरांनी गावठाणासाठी क्लस्टर (समुच्चय) विकास योजना राबविण्याचा प्रस्ताव शासनाकडे यापूर्वीच पाठविण्यात आला असून, तो तातडीने मंजूर करावा यासाठी पाठपुरावा करण्याची आदेशही महापौरांनी प्रशासनाला दिले.शहरात एकीकडे गावठाणातील वाडे धोकादायक असून तेथे राहणे धोकादायक असल्याच्या नोटिसा महपाालिका बजावते तर दुसरीकडे वाडे दुरुस्त करण्यासाठी वाडेमालक अथवा भाडेकरू गेले की पूररेषेत बांधकाम करता येत नाही असे सांगून दुरुस्तीदेखील करण्यास परवानगी नाकारली जाते. त्यामुळे महापालिकाच दुहेरी कोंडी करीत असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला.शहरातील नाले डीपीमधून गायबशहरातील नगर नियोजनाच्या दृष्टीने आवश्यक असलेले नाले दिवसेंदिवस गायब होत आहेत. २०१७ मध्ये महापालिकेचा शहर विकास आराखडा मंजूर झाला त्यात तर नालेच दर्शविण्यात आलेले नाही, अशी गंभीर बाब यावेळी संभाजी मोरुस्कर यांनी उघड केली. शहरात आलेल्या महापुरास अनेक गोष्टी कारणीभूत असून मूलत: नैसर्गिक नाले बंद झाल्यानेच हा प्रकार घडला असल्याचा आरोप डॉ. हेमलता पाटील यांनी केला. शहरात वीस नाले होते त्यापैकी आता केवळ तीन नाले अस्तित्वात शिल्लक आहेत. नाल्यांवर अतिक्रमण झाले असून, ते कसे कोणी केले याबाबत पुढील महासभेत अहवाल सादर झाला पाहिजे. अन्यथा यापूर्वी आपण अधिकाऱ्यांना गुलाब पुष्प देऊन स्वागत केले होते आता मात्र महासभेत हार आणून गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करू, असेही त्यांनी सांगितले.महासभा गुंडाळलीनाशिकरोड येथील रिपाइंचे माजी नगरसेवक सुनील वाघ यांचे निधन झाल्याने महासभेचे कामकाज आवरते घेण्यात आले. कामकाज तहकूब करावे, अशी मागणी गजानन शेलार यांनी केली. परंतु ती मान्य होत नसल्याचे बघून शिवसेनेचे नगरसेवकाही आक्रमक झाले. यामुळे धोरणात्मक विषय वगळता अन्य सर्व नागरी कामांना मंजुरी देण्यात आली.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाSmart Cityस्मार्ट सिटीMayorमहापौर