सभागृहाचे भाडे माफकच; मामा ठाकरे यांची स्पष्टोक्ती

By Admin | Updated: January 21, 2016 22:54 IST2016-01-21T22:53:33+5:302016-01-21T22:54:24+5:30

सभागृहाचे भाडे माफकच; मामा ठाकरे यांची स्पष्टोक्ती

The rent for the house is not enough; Mama Thackeray's Explanation | सभागृहाचे भाडे माफकच; मामा ठाकरे यांची स्पष्टोक्ती

सभागृहाचे भाडे माफकच; मामा ठाकरे यांची स्पष्टोक्ती

सिडको : येथील प्रबोधनकार ठाकरे सभागृहाचे कामकाज सुरळीत सुरू असून, सिडकोतील सर्व जातीधर्मियांना माफक दरात लग्न कार्यासाठी सभागृह देण्यात येत आहे. नागरिकांकडूनही घेण्यात येत असलेल्या भाड्यातून या सभागृहाच्या देखभाल दुरुस्तीसाठी खर्च केला जात असल्याचे श्री शिवछत्रपती सांकृतिक कला, क्रीडा मंडळाचे संस्थापक मामा ठाकरे यांनी स्पष्ट केले.
या सभागृहात दररोज वृद्धांसाठी प्राणायाम, योगा तसेच बैठकीसाठी सभागृह मोफत दिले जाते. परंतु याठिकाणी होणाऱ्या लग्न समारंभासाठी जादा भाडे आकारले जात असल्याचे नगरसेवक सांगत असेल तर यापुढे होणाऱ्या लग्न समारंभासह इतर कार्यक्रमांसाठी सभागृह मोफत देऊ; मात्र यानंतर नगरसेवकांनीच या सभागृहाच्या देखभालीचा खर्च द्यावा, असेही मामा ठाकरे यांनी सांगितले. (वार्ताहर)

Web Title: The rent for the house is not enough; Mama Thackeray's Explanation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.