कुटुंबाच्या सहकार्यानेच घडलोसुधा चंद्रन, वंदना गुप्ते यांचे प्रतिपादन

By admin | Published: December 21, 2014 12:35 AM2014-12-21T00:35:41+5:302014-12-21T00:36:03+5:30

कुटुंबाच्या सहकार्यानेच घडलोसुधा चंद्रन, वंदना गुप्ते यांचे प्रतिपादन

Rendering of the family with the help of Vivekanand Chandran, Vandana Gupte | कुटुंबाच्या सहकार्यानेच घडलोसुधा चंद्रन, वंदना गुप्ते यांचे प्रतिपादन

कुटुंबाच्या सहकार्यानेच घडलोसुधा चंद्रन, वंदना गुप्ते यांचे प्रतिपादन

Next

नाशिक : आम्ही आज आमच्या क्षेत्रात यशस्वी ठरलो असलो तरी हे सर्व केवळ कुटुंबीयांच्या सहकार्यानेच शक्य झाले़ करिअर की घर असाही एकवेळ प्रश्न आमच्या समोर निर्माण झाला मात्र यातूनही करिअरसाठी आम्हाला प्राधान्य देण्यास सांगत आम्हाला घडविण्यात कुटुंबीयांनीच मोठे योगदान दिल्याचे अभिनेत्री सुधा चंद्रन व वंदना गुप्ते यांनी येथे सांगितले़
दादासाहेब गायकवाड सभागृह येथे रोटरीच्या ‘नाशिक ३०३०’ विभागाच्या दोन दिवसीय रौप्यमहोत्सवी परिषदेत स्त्री सबलीकरणासाठी आयोजित ‘आम्ही कशा घडलो’ या कार्यक्रमात त्या बोलत होत्या़ मेधा साईखेडकर, रंजना पाटील व आशा वेणुगोपाल यांनी त्यांची मुलाखत घेतली़ यावेळी वंदना गुप्ते यांनी त्यांच्या ‘झुंझ’ या नाटकातील रखमा या पात्राची नाट्यछटा सादर केली़
याप्रसंगी रोटरीचे प्रांताध्यक्ष दत्तात्रय देशमुख, परिषदेचे अध्यक्ष डॉ. अजित भामरे, अलका भावसार, तुषार चव्हाण, राजीव कर्णिक, मधु रुग्णानी, महेश नेपालकर, संग्रामसिंग भोसले आदि मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Rendering of the family with the help of Vivekanand Chandran, Vandana Gupte

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.