रिंगरोडच्या मार्गातील अडथळे दूर कोट्यवधींची भरपाई : उंटवाडी, आगर टाकळीतून शॉर्टकट
By Admin | Updated: May 22, 2014 00:24 IST2014-05-21T22:55:04+5:302014-05-22T00:24:22+5:30
नाशिक- सिटी सेंटर मॉलकडून गोविंदनगरकडे जाणारा रस्ता, आगर टाकळी या ठिकाणी जागा ताब्यात नसल्याने रखडलेले रिंगरोड आता नुकसानभरपाईची रक्कम भरल्याने पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अनेक वर्षांपासून रखडलेल्या भूसंपादनाच्या प्रकरणांना गती मिळाली असून, महापालिकेने त्यासाठी कोट्यवधी रुपयांची रक्कम जिल्हा प्रशासनाकडे जमा केल्याने कुंभमेळ्यापूर्वी जवळपास सर्वच प्रमुख वळण मार्ग पूर्ण होणार आहेत.

रिंगरोडच्या मार्गातील अडथळे दूर कोट्यवधींची भरपाई : उंटवाडी, आगर टाकळीतून शॉर्टकट
नाशिक- सिटी सेंटर मॉलकडून गोविंदनगरकडे जाणारा रस्ता, आगर टाकळी या ठिकाणी जागा ताब्यात नसल्याने रखडलेले रिंगरोड आता नुकसानभरपाईची रक्कम भरल्याने पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अनेक वर्षांपासून रखडलेल्या भूसंपादनाच्या प्रकरणांना गती मिळाली असून, महापालिकेने त्यासाठी कोट्यवधी रुपयांची रक्कम जिल्हा प्रशासनाकडे जमा केल्याने कुंभमेळ्यापूर्वी जवळपास सर्वच प्रमुख वळण मार्ग पूर्ण होणार आहेत.
सिटी सेंटर मॉलकडून उंटवाडीमार्गे गोविंदनगर येथे जाणार्या मार्गासाठी आवश्यक ते भूसंपादन होत नव्हते. उंटवाडी येथे पूल बांधून तयार असून त्याला जोड रस्त्यासाठी जागा पालिकेच्या ताब्यात मिळत नव्हती. त्याचप्रमाणे पुढील जागांची प्रकरणेदेखील पूर्ण होत नव्हती. त्यामुळे रिंगरोड पूर्ण होत नव्हता. परंतु आता सर्व्हे नंबर ७७१, ७७८ पै. (मनोहरनगर, इंगळे कॉटेज) येथे ३० मीटर रस्त्यासाठी २ कोटी २६ लाख, याच ठिकाणी सर्व्हे नंबर ७४३ (निरंजन शाह) २ कोटी ७४ लाख, सर्व्हे नंबर ७६९, ७७० (जागा मालक अध्यारू व तिडके) यांना भरपाईपोटी ११ कोटी १४ लाख रुपयांपैकी ८ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.
अशाच प्रकारे आगर टाकळी ते संगमपुलादरम्यान रस्त्यासाठी १ कोटी ७७ लाख रुपये, पंचवटी कॅनॉल जवळील रस्त्याच्या जागेसाठी ४ कोटी रक्कमदेखील भरण्यात आली असून, त्यामुळे शहरातील अंतर्गत रिंगरोडसाठी मार्ग मोकळा झाला आहे.