नाशिक : मागील भांडणाची कुरापत काढून एकास मारहाण करण्यात आल्याची घटना तिडकेनगर येथे घडली आहे़ राजलक्ष्मी अपार्टमेंटमध्ये राहणारे विद्यासागर घुगे (२६) हे कॉलेजरोडवरील एका कपड्याच्या दुकानाबाहेरील पायरीवर बसलेले असताना संशयित संचेती आणि त्याचे दोन साथीदार यांनी मागील भांडणाची कुरापत काढून शिवीगाळ करीत मारहाण केली़ या प्रकरणी घुगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़(प्रतिनिधी)
कुरापत काढून एकास मारहाण
By admin | Updated: May 7, 2014 22:30 IST