नाशकात अतिक्रमित टपऱ्या हटविल्या; नागरिकांनी समाधान व्यक्त केले
By Suyog.joshi | Updated: January 9, 2024 15:18 IST2024-01-09T15:17:11+5:302024-01-09T15:18:31+5:30
शहरात दिवसेंदिवस अतिक्रमण वाढत आहे. त्यामुळे मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणे महपालिकेतर्फे हटविण्यात येत आहे.

नाशकात अतिक्रमित टपऱ्या हटविल्या; नागरिकांनी समाधान व्यक्त केले
नाशिक (सुयोग जोशी) : शहरात दिवसेंदिवस अतिक्रमण वाढत आहे. त्यामुळे मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणे महपालिकेतर्फे हटविण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. मंगळवारी शहरातील मुख्य भाग असलेल्या एन.डी. पटेल रोड ते कालिदास कला मंदिर तसेच शालिमार येथील टपरीधारकांवर कारवाई करण्यात आली.
हातगाड्यांवरही कारवाई करण्यात आली. तसेच रस्त्यात ज्या ठिकाणी जाहिराती बोर्ड व होर्डिंगवरही अतिक्रमण विभागाने कारवाई केली. दोन टपऱ्या, लोखंडी बाकडे असे एक ट्रक भरून साहित्य जप्त करून आडगाव गुदामात जमा करण्यात आले.
मनपाचे उपायुक्त नितीन नेर यांच्या आदेशानुसार विभागीय अधिकारी राजाराम जाधव, पश्चिम विभाग प्रमुख प्रवीण बागुल, निलेश काळे, जगन्नाथ हमारे, मेघनाथ तिडके, जावेद शेख, रमेश शिंदे, सुनील कदम यांनी कारवाईत भाग घेतला. काही दिवसांपूर्वी मनपाने रविवार कारंजासह मेनरोडवरही अतिक्रमणांविरोधात मोहीम राबविली होती.