कारमधून रोकडसह लॅपटॉप लांबविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:14 IST2021-09-27T04:14:45+5:302021-09-27T04:14:45+5:30
उमेश हरिभाऊ लासुरे (रा. मानेकशा नगर, द्वारका) यांनी तक्रार दाखल केली आहे. लासुरे गुरुवारी (दि. २३) सायंकाळच्या सुमारास वडनेर ...

कारमधून रोकडसह लॅपटॉप लांबविला
उमेश हरिभाऊ लासुरे (रा. मानेकशा नगर, द्वारका) यांनी तक्रार दाखल केली आहे. लासुरे गुरुवारी (दि. २३) सायंकाळच्या सुमारास वडनेर दुमाला येथून आपल्या घराकडे (एमएच १५ सीएम ०५१२) या कारने जात असताना ही घटना घडली. वडाळा रोडने ते प्रवास करीत असताना नासर्डी पुलापुढील साहिल लॉन्स समोर दोन-तीन अनोळखी व्यक्तींनी त्यांना थांबविले. यावेळी भामट्यांनी पाठीमागील नंबर प्लेटमधून रक्त पडत असल्याचे सांगितल्याने ते कार थांबवून पाठीमागील डिकीच्या दिशेने गेले असता एका तरुणाने कारमधील बॅग काढून घेत पोबारा केला. बॅगेत ७५ हजारांची रोकड आणि लॅपटॉप असा सुमारे १ लाख २५ हजारांचा ऐवज होता. अधिक तपास हवालदार घुगे करीत आहेत.