नाशिकरोड : देवी चौक येथील बुद्धविहारमध्ये भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने ९१व्या महिला मुक्ती दिनानिमित्त प्रतिमापूजन करून महिलांचा सत्कार करण्यात आला. बुद्धविहारमध्ये महिला मुक्ती दिनानिमित्त भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन भारतीय बौद्ध महासभेच्या महिला नाशिक शहर उपाध्यक्ष कल्पना भालेराव, संघटक नूतन साळवे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास रोहिणी साळवे, सुशीला जाधव, कुसुम चंद्रमोरे, आशा पवार, माया बागुल, वंदना गांगुर्डे, प्रवीण बागुल, चावदास भालेराव, मधुकर पगारे, प्रकाश बागुल, प्रभाकर कांबळे, किशोर शिंदे, राजेश चव्हाण, विलास गांगुर्डे्, माणिक साळवे, अमोल घोडे, प्रदीप शिंदे, शरद भडांगे, संतोष सोनवणे आदी उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दि. २५ डिसेंबर १९२७ रोजी महाड येथे परिषद घेऊन महिलांना धार्मिक, सामाजिक, राजकीय व मानवतेचे जीवन जगण्याचे स्वातंत्र्य दिले होते.
भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने ‘महिला मुक्ती’ दिनाचे स्मरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 00:21 IST