‘मणप्पुरम’ दरोड्याची आठवण...

By Admin | Updated: April 25, 2015 01:30 IST2015-04-25T01:29:32+5:302015-04-25T01:30:19+5:30

‘मणप्पुरम’ दरोड्याची आठवण...

Remembering the 'Manappuram' Draft ... | ‘मणप्पुरम’ दरोड्याची आठवण...

‘मणप्पुरम’ दरोड्याची आठवण...

नाशिक : १ आॅक्टोबर २०१३ रोजी बिटको चौकातील प्रतीक आर्केडच्या दुसऱ्या मजल्यावरील ‘मणप्पुरम गोल्ड फ ायनान्स’ या सोनेतारणावर कर्जपुरवठा करणाऱ्या कंपनी कार्यालयावर पोलिसांच्या वेषात आलेल्या पाच जणांनी बंदुकीचा धाक दाखवून दरोडा टाकल्याची घटना घडली होती़ या दरोड्यामध्ये पंधरा किलोहून अधिक सोने व तीन लाख रुपये रोकड अशा कोट्यवधींच्या ऐवजाची लूट करण्यात आली होती़ वाडीवऱ्हे येथील दरोड्याच्या घटनेमुळे शहरातील या सर्वात मोठ्या लुटीची आठवण ताजी झाली़ नाशिक शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच व चित्रपटातील शोभून दिसावी अशा प्रकारच्या या घटनेत दरोडेखोरांनी हुबेहुब पोलिसांची भूमिका वठवित, दोघांना बुरखे घालून तपासाचे कारण पुढे करीत ‘मणप्पुरम गोल्ड’च्या कार्यालयात प्रवेश केला व काही कळायच्या आतच रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून कार्यालयाचा ताबा घेतला. दरोडा यशस्वी झाल्याचे पाहून दरोडेखोरांनी लॉकर्समधील दागिने व दिवसाकाठी जमा झालेली तीन लाख रुपयांची रोकड हाती लागताच पोबारा केला. या घटनेनंतर तीन महिन्यांनी या दरोड्यातील एक आरोपी त्यांच्या वैयक्तिक भांडणातून व जीविताच्या भीतीने ठाणे पोलिसांना शरण आला होता़ यानंतर या दरोड्यातील काही संशयितांना नाशिक शहरातील उच्चभ्रू वस्तीतून अटक करण्यात आली होती़

Web Title: Remembering the 'Manappuram' Draft ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.