रेमडेसिवीर, ऑक्सिजनचा पुरवठा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:14 IST2021-04-11T04:14:21+5:302021-04-11T04:14:21+5:30
या संदर्भात सरचिटणीस अमोल पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने अन्न व औषध प्रशासन विभागाला निवेदन दिले असून, त्यात म्हटले आहे ...

रेमडेसिवीर, ऑक्सिजनचा पुरवठा करा
या संदर्भात सरचिटणीस अमोल पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने अन्न व औषध प्रशासन विभागाला निवेदन दिले असून, त्यात म्हटले आहे की, रेमडेसिवीर इंजेक्शन बंगलोर आणि हैदराबाद शहरांमधून नाशिकपर्यंत येण्यासाठी किमान ३ दिवस लागत आहेत. त्यासाठी पर्यायी वाहतूक मार्गाचा अवलंब करावा. त्याचप्रमाणे, सदर इंजेक्शनचे कमीतकमी पंधरा हजार डोस उपलब्ध होतील, असे नियोजन करण्यात यावे. सदर औषधाचा येणारा स्टॉक आणि त्याचे वितरण व्यवस्था याची माहिती सुयोग्य पद्धतीने जाहीर करण्यात यावी. जिल्ह्यात ऑक्सिजन सिलिंडर मिळणे अवघड झाले आहे. यासाठी प्रशासनामार्फत अतिरिक्त २० टन क्षमतेचा ऑक्सिजन टँकर लवकरात लवकर मागविण्यात यावा, जेणेकरून आगामी काळात आणखी जास्त क्षमतेने ऑक्सिजन उपलब्ध होऊ शकेल. यावर सहआयुक्तांनी उद्योगांसाठी ऑक्सिजन निर्मिती थांबवून, ती वैद्यकीय गरजेसाठी करण्यात येणार असल्याची माहिती दिली. यावेळी प्रमुख मुकेश शेवाळे, रमीझ पठाण आदी उपस्थित होते.