उपेक्षितांना सहकार्य करण्यासाठी धार्मिक संस्थांनी घ्यावा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 00:09 IST2017-09-24T00:09:39+5:302017-09-24T00:09:46+5:30
समाजातील उपेक्षितांना सहकार्य करण्यासाठी धार्मिक संस्थांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. कालिका देवी मंदिर ट्रस्ट यांच्यातर्फे राबविण्यात येणाºया विविध सामाजिक उपक्रमांमुळे सामाजिक बांधिलकी अधिकाधिक घट्ट होत आहे, असे मत शहराचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारी (दि. २२) कालिका देवी मंदिरात आयोजित भक्त निवासाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी व्यक्त केले.

उपेक्षितांना सहकार्य करण्यासाठी धार्मिक संस्थांनी घ्यावा पुढाकार
नाशिक : समाजातील उपेक्षितांना सहकार्य करण्यासाठी धार्मिक संस्थांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. कालिका देवी मंदिर ट्रस्ट यांच्यातर्फे राबविण्यात येणाºया विविध सामाजिक उपक्रमांमुळे सामाजिक बांधिलकी अधिकाधिक घट्ट होत आहे, असे मत शहराचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारी (दि. २२) कालिका देवी मंदिरात आयोजित भक्त निवासाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य पर्यटन विभाग आणि कालिका देवी मंदिर विश्वस्त मंडळ यांच्या वतीने उभारण्यात आलेल्या भक्त निवासाचे शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहराचे पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी लोकार्पण केले. संस्थानचे विश्वस्त केशवराव पाटील यांनी यावेळी प्रास्ताविक करताना भक्त निवासाच्या उभारणीसाठी पर्यटन विभागामार्फत एक कोटी १४ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाल्याचे सांगितले तसेच संस्थानतर्फे वर्षभर राबविण्यात येणाºया विविध उपक्रमांबाबतदेखील माहिती दिली. या लोकार्पण सोहळ्यास आमदार बाळासाहेब सानप, आमदार देवयानी फरांदे, महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, कालिका देवी मंदिर संस्थानचे केशवराव पाटील, प्रतापराव कोठावळे, सुभाष तळाजिया, आबासाहेब पवार आदी उपस्थित होते.