धार्मिक : तीन दिवस चालणाऱ्या विविध कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन
By Admin | Updated: March 20, 2015 23:49 IST2015-03-20T23:00:08+5:302015-03-20T23:49:29+5:30
कामाक्षी देवी मंदिराचा लोकवर्गणीतून जीर्णोद्धार

धार्मिक : तीन दिवस चालणाऱ्या विविध कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन
इगतपुरी : तालुक्यातील श्री क्षेत्र कावनई येथील कामाक्षी देवी मंदिराचा जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा सोहळा लोकवर्गणीतून ९ एप्रिल रोजी होत असून, यानिमित्त भजन, कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन कावनईचे सरपंच ज्ञानेश्वर पाटील यांनी केले आहे.
कामाक्षी देवी मंदिर जीर्णोद्धार व व्यवस्थापन समितीतील प्रकाश पाटील, नंदू पाडेकर, माधव शिरसाठ, गोपाळ पाटील, राजाभाऊ शिरसाठ, ज्ञानेश्वर पाटील, रामभाऊ पाटील, रामदास बांगर, उत्तम पाटील, प्रदीप शुक्ल, पंढरीनाथ पाटील, गोकुळ पाटील आदिंनी विशेष परिश्रम घेतल्यानेच या मंदिराचा जीर्णोद्धार लवकर होत आहे अशी माहिती ग्रामस्थांनी दिली. या मंदिर जीर्णोद्धाराच्या कार्यक्र मानिमित्त ९, १० व ११ एप्रिल या काळात भजन, कीर्तन, भव्य मिरवणूक असे कार्यक्र म घेण्यात येणार आहे. (वार्ताहर)