शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा
2
आजचे राशीभविष्य २५ जुलै २०२५ : या राशीला नशिबाची साथ लाभेल, धन प्राप्तीचे योग
3
ना नोकरी, ना सॅलरी तरीही मिळालं ५.५० कोटींचं कर्ज; SBI मध्ये मोठा घोटाळा उघड, १८ जण अटकेत
4
भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही
5
गाझामध्ये पूर्ण युद्धबंदी लागू करा, भारताचे आवाहन; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडले मत   
6
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ठरले भारी, कोलंबिया विद्यापीठ नमले! आता सरकारला २२० दशलक्ष डॉलर देणार
7
संसदेत गोंधळामुळे चौथ्या दिवशीही कोंडी; दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा तहकूब
8
रशियात विमान कोसळून ४८ जणांचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्यापही गुलदस्त्यात
9
ताईसाहेबांचे सासर, माहेर कोणते? मतदारांना मतपत्रिकेवर समजणार!
10
सहा फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच; हायकोर्टाने घातले बंधन; सरकारला निर्देश
11
अनिल अंबानींशी संबंधित ३५ ठिकाणी ईडीचे धाडसत्र; निवासस्थानी मात्र कारवाई नाही
12
मातृभाषेचा अभिमान बाळगताना अन्य भाषांचाही सन्मान करावा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
संपादकीय : बीसीसीआयला 'सरकारी' वेसण! ऑलिम्पिकच्या दिशेने मोठे पाऊल
14
७/११ : आरोपींच्या निर्दोष मुक्ततेला ‘सुप्रीम’ स्थगिती; आरोपी बाहेरच राहणार! पण.. 
15
सवतीचे घर बळकावण्यासाठी क्रेनचा वापर; साथीदारांसह घरात घुसून केली मारहाण
16
उपराष्ट्रपती निवडणुकीत कुणाचं पारडं जड? एनडीए की इंडिया, कोण मारणार बाजी, असं आहे संसदेतील मतांचं गणित  
17
"ते मराठीत न बोलल्याने भाषेला भोकं पडणार का?’’, अभिनेत्री केतकी चितळेचं वादग्रस्त विधान
18
"सोनिया गांधी आमच्या देवी आहेत, त्यांनी…”, तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी उधळली स्तुतीसुमने   
19
WTC मध्ये भारताचा टॉपर ठरला रिषभ पंत! हिटमॅन रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडला
20
हे सारं मी त्यांच्या सांगण्यावरून केलं, बनावट दूतावास चालवणाऱ्या हर्षवर्धनचा धक्कादायक दावा   

नवीन रुग्ण न आढळल्याने दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 00:16 IST

नाशिक : शहरात एकापाठोपाठ एक असे आठ कोरोनाबाधित आढळल्यानंतर गेल्या पाच दिवसांत नवीन बाधित रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे महापालिकेला एकीकडे दिलासा मिळत असला सर्दी, खोकला आणि तापाची लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या मात्र दिवसेंदिवस वाढत आहेत.

नाशिक : शहरात एकापाठोपाठ एक असे आठ कोरोनाबाधित आढळल्यानंतर गेल्या पाच दिवसांत नवीन बाधित रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे महापालिकेला एकीकडे दिलासा मिळत असला सर्दी, खोकला आणि तापाची लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या मात्र दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे गुरुवारी (दि. २३) महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात पंधरा संशयितांना दाखल करण्यात आले आहे.गेल्या महिन्यात कोरोना संसर्गाचा उपसर्ग वाढू लागल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. जिल्ह्यात आणि नाशिक शहरातदेखील संचारबंदीचे पालन अत्यंत कडकपणे करण्यात आले असल्याने बाधित रुग्ण आढळत नव्हते. मात्र, नंतर गोविंदनगर येथे एक नागरिक कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ऐकेक करीत संख्या वाढत गेली. आत्तापर्यंत शहरात दहा कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. ज्या गोविंदनगर, बंजरंगवाडी, नाशिकरोड, संजीवनगर, नवश्या गणपती परिसरात रुग्ण आढळले आहे. तेथे कन्टेनमेंट झोन घोषित करण्यात आले आहेत. त्याठिकाणी पाचशे मीटर ते तीन किलोमीटर परिघातील क्षेत्र सील करण्यात आले आहेत आणि तेथे घर सर्वेक्षण करण्यात आले. गोविंदनगर भाग वगळता अन्य भागांत ही तपासणी सुरूच आहे. नागरिकांचे घर सर्वेक्षण करून गुरुवारी (दि. २३) ३ हजार ५५९ घरांमधील १३ हजार ८३८ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यातदेखील प्रामुख्याने सर्दी, खोकला आणि तापाची लक्षणेच आढळत आहेत. गुरुवारी (दि.२३) सर्दी, खोकला व तापाची लक्षणे असलेले १५ संशयित दाखल झाले असून, त्यांचे घसास्त्राव नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. अर्थात, गेल्या दोन दिवसांपासून या भागात एकही नवीन संशयित रुग्ण आढळून आलेला नसल्याने प्रशासनाला काहीसा दिलासा मिळाला आहे.---------‘त्या’ चाळीस अहवालांची प्रतीक्षामहापालिका क्षेत्रात प्रथम बाधित रुग्ण आढळल्यानंतरच महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी अत्यंत काटेकोरपणे आरोग्य नियमांची अंमलबजावणी सुरू केली. आतापर्यंत ४८५ संशयित रुग्णांचे घसास्त्रावाचे नमुने घेण्यात आले आहेत. त्यापैकी दहाजण कोरोनाबाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला, तर ४३३ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सध्या ४० अहवाल प्रलंबित आहेत. हे सर्व अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर खऱ्या अर्थाने मनपाला दिलासा मिळू शकणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिक