विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुटका
By Admin | Updated: March 14, 2017 23:25 IST2017-03-14T23:18:30+5:302017-03-14T23:25:25+5:30
दिंडोरी : तालुक्यातील जानोरी गावातील शिवनई रोडवरील विहिरीत पडलेल्या बिबट्याला ग्रामस्थांच्या सहकार्याने सुखरु प बाहेर काढून जेरबंद करण्यात आले.

विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुटका
दिंडोरी : तालुक्यातील जानोरी गावातील शिवनई रोडवरील एका शेतकऱ्याच्या शेतातील विहिरीत पडलेल्या बिबट्याला भुलीचे इंजेक्शन देऊन वनविभागाचे कर्मचारी व ग्रामस्थांच्या सहकार्याने सुखरु प बाहेर काढून जेरबंद करण्यात आले.
शिवनई रोडवरील अरुण वामन तिडके यांच्या गट नं ८९८ मधील शेतातील विहिरीत मध्यरात्रीच्या वेळेस बिबट्या पडला. सकाळी शेतकऱ्याने विहिरीत बिबट्याला बघितल्यावर त्याने तत्काळ ग्रामस्थांसह तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रेवचंद वाघ यांना माहिती दिली. वाघ यांनी वनविभाग व पोलीसपाटलांना दूरध्वनीवरून कळविले. वनविभागाचे कर्मचारी व ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीत पडलेल्या बिबट्याला वर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र यश आले नाही. वनविभागाचे कर्मचारी सुनील वाडेकर यांनी विहिरीत उतरून बिबट्याला भुलीचे इंजेक्शन मारून त्यास बाहेर काढले. नंतर जेरबंद केले. याकामी अनिल दळवी, हेमराज महाले, सुरेश चौधरी, उपसंरपच विष्णू काठे, नामदेव तिडके, भारत काठे, सुरेश ठाकरे, मंगेश ठाकरे आदि ग्रामस्थांनी सहकार्य केले. (वार्ताहर)