पंचवटी : गेल्या महिन्यात सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर आल्याने उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांच्या मदतीसाठी १९८३ च्या पोलीस अधिकारी बॅचमधील सेवानिवृत्त पोलीस अधिकारी वर्गाने आपल्या निवृत्तिवेतनातून सुमारे साडेतीन लाख रुपयांचा निधी जमा करून पूरग्रस्तांना रोख आणि वस्तूस्वरूपात मदत केली.१९८३ च्या बॅचचे महाराष्ट्र पोलीस अधिकारी जरी आता निवृत्त झाले असले तरी सर्वांनी महाराष्ट्राच्या कानाकोपºयात समाजसेवेचा वसा चालूच ठेवला आहे. अनेक अधिकारी समाजातील गरजूंना कायम मदत करतात.गेल्या महिन्यात सांगली, सातारा, कोल्हापूर येथे आलेल्या महापुरात बरेच संसार उद्ध्वस्त झाले. १९८३ च्या अधिकाºयांनी पीडितांना मदत करायचे ठरविले. सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्त धनराज दायमा, पोपट तिवाटणे, प्रफुल्ल भोसले, खंडेराव पाटील, यशवंत व्हटकर, देवा वडमारे व इतरांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी आपल्या सेवा निवृत्तिवेतनातून यथाशक्ती रक्कम जमा करून एकूण साडेतीन लाख रुपये जमा केले.कोल्हापूर व सांगलीच्या तुकडीतील मित्रांनी प्रत्यक्ष पीडितांच्या गावाला भेट देऊन खºया गरजूंची माहिती काढत दि. ८ व ९ सप्टेंबरला महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात स्थायिक झालेले १५ मित्र सेवानिवृत्त अधिकारी कोल्हापूर-सांगलीत पोहोचले. कोल्हापूर जिल्ह्यातील निळेवाडी गावात, सांगली जिल्ह्यातील आमनापूर, बुरली, अंकलखोप गावातील पीडित नागरिकांना रोख आर्थिक व तयार कपडे अशी मदत केली. त्याचप्रमाणे आमनापूरचे प्राथमिक शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप केले.
निवृत्तिवेतनातून पूरग्रस्तांना मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 00:20 IST
गेल्या महिन्यात सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर आल्याने उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांच्या मदतीसाठी १९८३ च्या पोलीस अधिकारी बॅचमधील सेवानिवृत्त पोलीस अधिकारी वर्गाने आपल्या निवृत्तिवेतनातून सुमारे साडेतीन लाख रुपयांचा निधी जमा करून पूरग्रस्तांना रोख आणि वस्तूस्वरूपात मदत केली.
निवृत्तिवेतनातून पूरग्रस्तांना मदत
ठळक मुद्देसेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांचा उपक्र म