व्याख्यानमालेची सुटका; प्रतिष्ठानला मात्र फटका

By Admin | Updated: August 6, 2014 02:03 IST2014-08-06T01:46:48+5:302014-08-06T02:03:35+5:30

व्याख्यानमालेची सुटका; प्रतिष्ठानला मात्र फटका

Release of lecture; The establishment only hit | व्याख्यानमालेची सुटका; प्रतिष्ठानला मात्र फटका

व्याख्यानमालेची सुटका; प्रतिष्ठानला मात्र फटका

 

नाशिक : कठोर परिश्रम घेत सातत्याने पाठपुरावा केला तर यश निश्चित मिळते, याचे उदाहरण नाशिक वसंत व्याख्यानमाला या संस्थेने घालून देत अवसायनात गेलेल्या श्रीराम बॅँकेत अडकलेली संपूर्ण ठेव परत मिळविली. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्याही सुमारे १२ लाख रुपयांच्या ठेवी श्रीराम बॅँकेत अडकल्या आहेत; परंतु या ठेवी मिळविण्याबाबत प्रतिष्ठानचे विश्वस्त मंडळ मख्खपणे बसून आहे. त्यामुळेच की काय, प्रतिष्ठानच्या लेखापरीक्षणात सनदी लेखापालांनी टिपणी नोंदविताना सदर ठेवी लवकरात लवकर परत मिळविण्याच्या दृष्टीने न्यासाने प्रयत्न करण्याचा सल्ला दिला आहे.
सन २००७ मध्ये श्रीराम बॅँक अवसायनात निघाल्याने ठेवी परत मिळविण्याबाबत विश्वस्त संस्थांपुढे मोठा पेच उभा राहिला. शहरातील सुमारे ८९ विश्वस्त संस्थांच्या लाखोच्या ठेवी श्रीराम बॅँकेत अडकल्या आहेत. रिझर्व्ह बॅँकेच्या विमा धोरणानुसार काही संस्थांना एक लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी परत मिळाल्या. नाशिक वसंत व्याख्यानमालेचीही पाच लाख ८९ हजार रुपयांची ठेव श्रीराम बॅँकेत अडकली होती. व्याख्यानमालेच्या पदाधिकाऱ्यांनी गेल्या सहा वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करत संपूर्ण ठेव परत मिळविली. मालेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यासाठी अनेक पर्यायांचा शोध घेतला. अखेरीस थकबाकीदार कर्जदाराच्याच माध्यमातून तोडगा काढत मालेने संपूर्ण ठेव परत मिळविण्यात यश मिळविले. श्रीराम बॅँकेत कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्याही १२ लाख २६ हजार ५१५ रुपयांच्या ठेवी अडकलेल्या आहेत. सुरुवातीच्या काळात प्रतिष्ठानच्या काही पदाधिकाऱ्यांनी बॅँकिंग क्षेत्रात कार्यरत असलेल्या माजी विश्वस्ताच्या मदतीने ठेवी परत मिळविण्यासाठी प्रयत्न केले; परंतु नंतर त्याबाबत सातत्याने पाठपुरावा झाला नाही. सद्यस्थितीत सुमारे पावणेतीन लाखांचे व्याज व मुदतठेवीची रक्कम याप्रमाणे सुमारे १५ लाख रुपयांच्या वर रक्कम अडकून पडली आहे. प्रतिष्ठानचे कोषाध्यक्षपदही बॅँकिंग क्षेत्रात तज्ज्ञ समजल्या जाणाऱ्या व्यक्तीच्या हाती आहे; परंतु त्यांनाही ठेवी परत मिळविण्याच्या दृष्टीने पर्याय शोधता आलेले नाहीत. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा सन २०१३-१४ चा वार्षिक अहवाल सभासदांना नुकताच वितरित झाला असून, त्यात सनदी लेखापालांनी हिशेबासंबंधी टिप्पणी करताना श्रीराम बॅँकेत अडकलेल्या ठेवी परत मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे येत्या ९ आॅगस्ट रोजी होणाऱ्या प्रतिष्ठानच्या वार्षिक सभेत ठेवींचा मुद्दा चर्चेला येण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Release of lecture; The establishment only hit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.