क्षत्रिय अहिर शिंपी समाज सभागृहाचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 00:18 IST2017-08-01T00:18:26+5:302017-08-01T00:18:45+5:30
येथील क्षत्रिय अहिर शिंपी समाजाच्या नूतन सभागृहाचा लोकार्पण सोहळा उपमहापौर प्रथमेश गिते व समाजाचे अध्यक्ष शेखर निकुंभ यांच्या हस्ते करण्यात आला.

क्षत्रिय अहिर शिंपी समाज सभागृहाचे लोकार्पण
सिडको : येथील क्षत्रिय अहिर शिंपी समाजाच्या नूतन सभागृहाचा लोकार्पण सोहळा उपमहापौर प्रथमेश गिते व समाजाचे अध्यक्ष शेखर निकुंभ यांच्या हस्ते करण्यात आला. पेलिकन पार्कनजीक श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाजाचे मंगल कार्यालय असून, समाज बांधवांच्या सोयीसाठी मंगल कार्यालयाचा दुसरा मजला व तिसºया मजल्यावर बांधकाम करून सभागृह बांधण्यास आले. या नूतन सभागृहाचे लोकार्पण उपमहापौर प्रथमेश गिते यांच्या हस्ते करण्यात आले. याठिकाणी संगणकीय वर्ग सुरू करण्यात येणार असून समाजातील गरीब व होतकरू महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा यासाठी या जागेत मोफत शिवण क्लासेस सुरू करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष शेखर निकुं भ यांनी सांगितले. याप्रसंगी नगरसेवक सतीश सोनवणे, राजेंद्र वाडीकर, मुकुंद मांडगे, सुभाष बेंडाळे, जयप्रकाश चव्हाण, के. यू. गवांदे, अमर सोनवणे, प्रवीण निकुंभ, अरुण महाले, शशिकांत मांडगे, रवींद्र जाधव, नरेंद्र शिंपी यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.