विहिरीत पडलेल्या बछड्याची दोन तासात सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 18:35 IST2019-11-24T18:34:43+5:302019-11-24T18:35:32+5:30
सटाणा:सावज शोधण्याच्या नादात विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या सात ते आठ महिन्याच्या बछड्याची वनविभाग आणि नागरिकांनी दोन तासात सुटका करण्यात यश आले.ही घटना आज रविवारी तालुक्यातील तरसाळी येथे घडली.

तरसाळी येथील गोपा पांडुरंग रौंदळ यांच्या विहिरीत पडलेला बछाडा.
सटाणा:सावज शोधण्याच्या नादात विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या सात ते आठ महिन्याच्या बछड्याची वनविभाग आणि नागरिकांनी दोन तासात सुटका करण्यात यश आले.ही घटना आज रविवारी तालुक्यातील तरसाळी येथे घडली.
तरसाळी येथील शेतकरी गोपा पांडुरंग रौंदळ यांच्या शेतात आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास सावजच्या शोधार्थ निघालेला बिबट्याचा बछडा थेट विहिरीतच पडला.रौंदळ यांनी तत्काळ वन विभागाचे अधिकारी रमेश साठे यांना माहिती दिली. णात त्याने धूम ठोकली .दरम्यान या बछड्याने रौंदळ यांच्या तीन कोंबड्यांचा फडशा पडल्याचे उघडकीस आले.वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामा केला आहे .दरम्यान बछड्याला जंगलात सुरिक्षत ठिकाणी हलविण्यासाठी वन विभागाने तत्काळ पिंजरा लावावा अशी मागणी शेतकº्यांनी केली आहे .