शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

सातपूरला विवाहित शिक्षिकेचा संशयास्पद मृत्यूने नातेवाईक संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 20:38 IST

घटनेची माहिती सातपूर पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह जमिनीवर उतरवून पंचनामा करत तत्काळ जिल्हा रूग्णालयात हलविला, कारण यावेळी परिसरात मोठी गर्दी जमा झाली होती.

ठळक मुद्देतेजस्विनी राकेश भामरे एका शाळेत शिक्षक होत्या‘दोषींवर निश्चित कायदेशीर कारवाई’

नाशिक : सातपूर पोलीस ठाणे हद्दीत अशोकनगरमधील संभाजीनगर भागात राहणाऱ्या एका खासगी शाळेच्या महिला शिक्षकाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि.२) सकाळी सुमारे पावणेअकरा वाजेच्या सुमारास घडली. या घटनेनंतर पालिसांनी मृतदेह जिल्हा रूग्णालयात आणला असता माहेरवाशिण मयत महिलेच्या नातेवाईकांना संताप व्यक्त करत पोलिसांना धारेवर धरले.अशोकनगर भागात राहणा-या शहरातील एका शाळेत शिक्षक म्हणून नोकरी करणा-या तेजस्विनी राकेश भामरे (२६) या महिलेचा सकाळी संशयास्पद मृत्यू झाला. राहत्या घराच्या वरच्या खोलीत भामरे खासगी शिकवणी वर्ग घेत होत्या. शिकवणी वर्ग सुटल्यानंतर काही वेळानंतर त्यांचा मृतदेह त्या घराच्या छताच्या पंख्याच्या दोरीला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती सातपूर पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह जमिनीवर उतरवून पंचनामा करत तत्काळ जिल्हा रूग्णालयात हलविला, कारण यावेळी परिसरात मोठी गर्दी जमा झाली होती. दरम्यान, भामरे यांच्या माहेरचे नातेवाईक रूग्णालयात दाखल झाल्यानंतर त्यांनी ‘माहेरचे लोक येण्यापुर्वी मृतदेह जिल्हा रूग्णालयात का आणला’ असा जाब विचारत पोलिसांना धारेवर धरले. यावेळी जमलेल्या माहेरच्या लोकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला तसेच जोपर्यंत तेजस्विनीच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या सासरच्या मंडळींवर कारवाई होत नाही, तोपर्यंत शवविच्छेदन न करण्याची भूमिका नातेवाईक महिला, पुरूषांनी घेतली होती. त्यामुळे वरिष्ठ पोलीस निरिक्षक राकेश हांडे व सातपूर पोलिसांनी तत्काळ जिल्हा रूग्णालयात धाव घेत संतप्त झालेल्या नातेवाईकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; मात्र नातेवाईकांची आक्रमक भूमिका कायम होती.‘दोषींवर निश्चित कायदेशीर कारवाई’सहायक आयुक्त मंगलसिंह सुर्यवंशी यांनी जिल्हा रूग्णालयात धाव घेत नातेवाईकांची समजूत काढली. सुमारे वीस मिनिटे सुर्यवंशी यांनी मयत तेजस्विनी यांचे भाऊ, बहीण, आई व अन्य नातेवाईकांची समजूत काढत ‘दोषी आढळणाºया कोणाचीही गय केली जाणार नाही, तुम्हाला सासरच्या ज्या व्यक्तींविरूध्द संशय वाटत असेल, त्यांच्याविरूध्द तक्रार द्या, पोलीस तपास करून संशयितांविरूध्द कायदेशीर कारवाई, करतील याची खात्री बाळगा’ असे आश्वासन त्यांनी विश्वासात घेत दिल्यानंतर संतप्त नातेवाईकांचा रोष कमी झाला. पोलीस बंदोबस्तात शवविच्छेदन प्रक्रिया पार पडली तसेच अंत्यविधीच्यावेळीही सातपूर पोलीस कर्मचारी अमरधाममध्ये तैनात करण्याचे आदेशयावेळी सुर्यवंशी यांनी हांडे यांना दिले. शवविच्छेदनानंतर संध्याकाळी माहेरच्या लोकांनी तेजस्विनी यांचा मृतदेह ताब्यात घेतला.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयTeacherशिक्षकSuicideआत्महत्या