नाते संबंधातले पदर अलगदपणे उलगडणारे ‘तुझ्या-माझ्यात’

By Admin | Updated: October 21, 2015 22:45 IST2015-10-21T22:42:27+5:302015-10-21T22:45:17+5:30

राज्य नाट्य स्पर्धेत नाटकाचा सहभाग

The relationship between the relationship between the separators 'yours-in-me' | नाते संबंधातले पदर अलगदपणे उलगडणारे ‘तुझ्या-माझ्यात’

नाते संबंधातले पदर अलगदपणे उलगडणारे ‘तुझ्या-माझ्यात’

नाशिक : एमबीए झालेली आणि आजपर्यंत गृहिणी राहिलेली वयाच्या चाळीसाव्या वर्षी अचानक मॉडेलिंग करण्याचा निर्णय घेते आणि सुखाने चाललेल्या संसारात अचानक विघ्न आल्याने संपूर्ण कुटुंबाची निर्माण झालेली नाजूक परिस्थिती ‘तुझ्या-माझ्यात’ या दोन अंकी नाटकात दाखविण्यात आली आहे. आयएमएच्या वतीने कालिदास कलामंदिर येथे तुझ्या-माझ्यात या नाट्य प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते.
नाशिकरोड येथील हौशी डॉक्टर कलावंतांनी या नाट्य प्रयोगात आपली कला सादर करण्याचा अनोखा प्रयत्न केला आहे. डॉक्टर कलावंत नेहमी आपल्या वैयक्तिक आयुष्यातली सुख-दु:खे बाजूला सारत रुग्णांना प्रसन्न चेहऱ्याने सामोरे जाऊन दिलासा देत असतानाच त्यांनी रंगमंचावर तन्मयतेने आपल्या केलेने पे्रक्षकांना खिळवून ठेवले.
पती-पत्नी, स्त्री-पुरुष, पालक आणि मुले या सगळ्याच नात्यांचे बारकावे या दोन अंकी नाटकात अचूक टिपले आहेत. घरातील एका सदस्याने चौकटीबाहेर जाऊन नवे काही तरी करण्याचा प्रयत्न करत असताना कुटुंबाची वाताहत होऊ नये म्हणून कुटुंबातील प्रत्येकाने आपले स्वातंत्र्य जपत कौटुंबिक चौकट न मोडता नवनव्या बदलांना सामोरे जात ही चौकट कशी विस्तारली जाते याचे दर्शन या नाटकातून पहायला मिळते.
नाटकाची रंगव्यवस्था सांभाळणाऱ्या आणि लेखिका तन्वी अमित यांनी ‘तुझ्या-माझ्यात’ हे नाटक राज्य नाट्य स्पर्धेत भाग घेत असल्याचे यावेळी सांगितले. या नाटकात डॉ. प्राजक्ता भांबारे, डॉ. माधवी मुठाळ, डॉ. सुशील अहिरे, मोहन अमसेर, आसावरी वाणी यांनी भूमिका साकारल्या आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: The relationship between the relationship between the separators 'yours-in-me'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.