शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

वास्तववादी चित्रपट नाकारणे दुर्दैवी; अंकुर चित्रपट महोत्सवास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 00:18 IST

आपल्या देशातच नव्हेतर जगात वास्तववादी चित्रपट नाकारला जातो. ही गोष्ट दुर्दैवी आहे. काही चित्रपट वास्तववादी तर, काही चित्रपट कल्पनाविलासी असतात. वास्तवाधारित चित्रपटांचा आपल्याकडे स्वीकार होत नाही अशी खंत राष्ट्रीय पुरस्कार विजेते गिरीश कासारवल्ली यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देकाही चित्रपट वास्तववादी सामाजिक विषयांवरील चित्रपट दाखविण्यात येणार

नाशिक : आपल्या देशातच नव्हेतर जगात वास्तववादी चित्रपट नाकारला जातो. ही गोष्ट दुर्दैवी आहे. काही चित्रपट वास्तववादी तर, काही चित्रपट कल्पनाविलासी असतात. वास्तवाधारित चित्रपटांचा आपल्याकडे स्वीकार होत नाही अशी खंत राष्ट्रीय पुरस्कार विजेते गिरीश कासारवल्ली यांनी व्यक्त केली.  येथील अभिव्यक्ती मीडिया फॉर डेव्हलपमेंट या सामाजिक संस्थेतर्फे आयोजित सहाव्या चित्रपट महोत्सवास बुधवारी शानदार प्रारंभ झाला. येथील कुसुमाग्रज स्मारकात बुधवारी सायंकाळी महोत्सवाचे उद्घाटन राष्टÑीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक पद्मश्री गिरीश कासारवल्ली यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी व्यासपीठावर संजय सावळे, रघुनाथ फडणीस आदी मान्यवर उपस्थित होते. महोत्सवाच्या बोधचिन्हाचे अभिनव पद्धतीने अनावरण करण्यात आले. कॅमेºयाच्या प्रतिकृतीचे उद्घाटन करीत महोत्सवाला प्रारंभ झाला. कासारवल्लींच्या ‘इमेजेस अ‍ॅँड रिफ्लेक्शन्स’ या चित्रपटाचे यावेळी प्रदर्शन करण्यात आले. कासारवल्ली यांनी चित्रपट निर्मितीतील आव्हाने, त्यातून मिळणारा आनंद, चित्रपट निर्मितीत बदलत गेलेली प्रक्रिया याविषयी मार्गदर्शन केले.याप्रसंगी चित्रपटप्रेमी रसिक बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमस्थळी चित्रपटसृष्टीतील चालू घडामोडींच्या प्रतीकांचे मॉडेल सेल्फी पॉइंट म्हणून उभारण्यात आले असून, प्रेक्षकांचा त्यास प्रतिसाद लाभत आहे. महोत्सवात गुरुवारी (दि. २३) सकाळी १०.३० पासून विविध चित्रपटांचे सादरीकरण करण्यात येणार असून, दुपारी २ वाजता प्रा. हृषिकेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत अंकुरमधील लघुपट व माहितीपटावर चित्रपट रसग्रहण कार्यशाळा होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता आर्टिझेन्स या वेबसिरीजचे निर्माते जयेश आपटे यांच्याशी संवाद साधला जाणार आहे. रात्री ८ वाजता प्रख्यात नृत्यांगना दीपा बक्षी यांच्या कथ्थक नृत्याचे सादरीकरण व त्याविषयी प्रेक्षकांशी संवाद होईल. महोत्सवात देशभरातून आलेले विविध सामाजिक विषयांवरील चित्रपट दाखविण्यात येणार असून, रसिक प्रेक्षकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन अभिव्यक्तीतर्फे करण्यात आले आहे.

टॅग्स :Nashikनाशिकcinemaसिनेमा