बार्न स्कूल नियमित सुरू, कर्मचाऱ्यांचा प्रश्न कायम
By Admin | Updated: September 27, 2016 01:10 IST2016-09-27T01:10:26+5:302016-09-27T01:10:44+5:30
बार्न स्कूल नियमित सुरू, कर्मचाऱ्यांचा प्रश्न कायम

बार्न स्कूल नियमित सुरू, कर्मचाऱ्यांचा प्रश्न कायम
देवळाली कॅम्प : बॉर्न्स स्कूलचा कर्मचारी चिनप्पा मंद्री याने फाशी घेतल्याप्रकरणी अटक असलेल्या प्राचार्य ज्युलियन लूक यांना नाशिकरोड न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. दरम्यान, सोमवारपासून शाळा सुरू झाली असून, शाळेजवळील पोलीस बंदोबस्त कायम आहे. बार्न्स स्कूल येथे गेल्या बुधवारी (दि.२१) चिनप्पा यांनी गळफास घेऊन आत्महत्त्या केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या प्राचार्य लूक यांना सोमवारी (दि.२६) न्यायालयीन कोठडी मिळाली. ९४ कर्मचाऱ्यांना परत कामावर घेण्याबाबत बॉम्बे एज्युकेशन ट्रस्टने तयारी दर्शवित सोमवारी शाळा सुरू झाल्यानंतर निर्णय घेऊ, असे सांगितले होते. मात्र सोमवार रोजी शाळा नियमित सुरू होऊनदेखील दिवसभरात गेटवर उपस्थित असलेल्या कामगारांशी कोणीही चर्चा केली नाही उलट प्राचार्य लूक न्यायालयीन कोठडीतून मुक्त होतील, त्यानंतर निर्णय घेऊ असे सांगण्यात आल्याचे अनेक कर्मचाऱ्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. गेल्या सात महिन्यांपासून सुरू असलेला संपातील मागण्या कर्मचाऱ्यांनी तीन महिन्यांपूर्वीच मागे घेतल्या असल्या तरी कामगारांना कामावर रुजू करून घेण्यात आलेले नाही, याबाबत कामगारांशी संपर्क केला असता अजून दोन दिवस वाट पाहणार असल्याचे सांगण्यात आले. बार्न स्कूलचे व्यवस्थापनाच्या ९४ कामगारांनी औद्योगिक न्यायालयात धाव घेतली असून, हा लढा अद्यापही सूर आहे. दरम्यान, संपकरी कामगारांना अजूनही व्यवस्थापनाने कामावर घेतले नसून शाळा सोमवारपासून नियमतिपणे सुरू होऊन सहामाही परीक्षांना सुरुवात झाली आहे. (वार्ताहर)