प्रादेशिक परिवहन अधिकारीपद रिक्तच

By Admin | Updated: July 15, 2016 00:18 IST2016-07-15T00:03:23+5:302016-07-15T00:18:46+5:30

प्रादेशिक परिवहन अधिकारीपद रिक्तच

Regional Transport Officer vacant | प्रादेशिक परिवहन अधिकारीपद रिक्तच

प्रादेशिक परिवहन अधिकारीपद रिक्तच

 पंचवटी : प्रादेशिक परिवहन विभागाचे परिवहन अधिकारी जीवन बनसोड हे सेवानिवृत्त होऊन तब्बल पंधरवड्याचा कालावधी लोटला असला तरी प्रादेशिक परिवहन कार्यालयात प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली नसल्याने सध्या परिवहन कार्यालयाला प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची प्रतीक्षा करावी लागत आहे.
बनसोड यांच्या सेवानिवृत्तीनंतर त्यांचा पदभार तात्पुरता उपप्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्याने कळसकर यांची कामाची जबाबदारी वाढली आहे.तब्बल पंधरवडा लोटूनही नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती न केल्याने सध्या उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनाच प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचा पदभार सांभाळण्याची जबाबदारी पार पाडावी लागत आहे.

Web Title: Regional Transport Officer vacant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.