जुन्या पेन्शन संदर्भात भुजबळ यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 23:05 IST2019-06-06T22:59:39+5:302019-06-06T23:05:48+5:30

साकोरा : नांदगाव तालुक्यातील शिक्षकांनी चांदोरा येथील चारा छावणीला भेट देण्यासाठी आलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ तसेच आ.पंकज भुजबळ यांना जुन्या पेन्शन संदर्भात निवेदन दिले.

Regarding old pension, Bhujbal appealed | जुन्या पेन्शन संदर्भात भुजबळ यांना निवेदन

चांदोरा येथील चारा छावणीला भेट देण्यासाठी गेलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ. त्याप्रसंगी आमदार पंकज भुजबळ यांना निवेदन देताना ग्रामस्थ.

ठळक मुद्देमोठ्या  संख्येने शिक्षक कर्मचारी उपस्थितीत

साकोरा : नांदगाव तालुक्यातील शिक्षकांनी चांदोरा येथील चारा छावणीला भेट देण्यासाठी आलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ तसेच आ.पंकज भुजबळ यांना जुन्या पेन्शन संदर्भात निवेदन दिले.
सदर निवेदनात सन २००५पूर्वी नियुक्त शिक्षक कर्मचार्यांवर कसा अन्याय झाला आहे. याबाबत समस्या मांडण्यात आल्या आहेत.याबाबत निवेदन देतांना शिक्षकांनी चर्चा केली.त्यावर भुजबळांनी मुख्यमंत्री तसेच शिक्षणमंञी मोहदयाना पञ पाठवून मतदार संघातील व महाराष्ट्रातील अन्याय झालेल्या कर्मचारी यांना न्याय मिळून देण्यासाठी पाठपूरावा करु असे आश्वासन दिले.
यावेळी तालुक्यातील शिक्षक योगेश पाटील, गोंविदराव मोगल, रविंद्र बोरसे, भाऊसाहेब सरोदे, राजू बोरसे, भारत बोरसे, चंद्रशेखर पवार, प्रकाश पवार, संजय बोरसे, भाऊसाहेब डोखे आदी मोठ्या संख्येने शिक्षक कर्मचारी उपस्थितीत होते.

Web Title: Regarding old pension, Bhujbal appealed