गर्भपातास नकार; पत्नीला पेटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 05:53 IST2018-03-26T05:53:04+5:302018-03-26T05:53:04+5:30

गर्भपातास नकार दिल्याने पत्नीला पेटविल्याची घटना शनिवारी रात्री येथे घडली

Refuse abortion; The wife got bigger | गर्भपातास नकार; पत्नीला पेटविले

गर्भपातास नकार; पत्नीला पेटविले

सटाणा (नाशिक) : गर्भपातास नकार दिल्याने पत्नीला पेटविल्याची घटना शनिवारी रात्री येथे घडली. पाच महिन्यांच्या गर्भवती महिलेचा दीर व सासराही या गुन्ह्यात सहभागी होता.
यात गर्भवती रुपाली विलास कुमावत (२४) ५५ टक्के भाजली असून तिच्यावर नाशिकच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ती आपल्या मुलांसह पती विलास दशरथ कुमावत, दीर योगेश व सासरा दशरथ गंगाधर कुमावत समवेत वास्तव्यास आहे. काही महिन्यांपूर्वी रुपालीला दिवस गेल्यापासूनच घरात खटके उडत होते. गर्भपात करत नाही म्हणून तिचा मानसिक व शारीरिक छळ सुरू होता. दरम्यान शनिवारी रात्री नऊच्या सुमारास याच कारणावरून चौघांमध्ये जोरदार भांडण झाले. त्या वेळी विलासने दांडूक्याने रुपालीला बेदम मारहाण केली. गर्भपात केला नाही तर तुला जाळून टाकू, अशी धमकी देत विलासने रुपालीच्या अंगावर पेट्रोल टाकले आणि दीर योगेशने पेटवून दिले, असे रुपालीने फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी सटाणा पोलिसात तिघांविरुद्ध प्राणघातक हल्ला व हुंडाबळीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघेही पसार झाले आहेत.

सात वर्षांपूर्वी विलास आणि रुपाली यांचा प्रेमविवाह झाला होता. दोघांना तीन अपत्य असून पाच महिन्यांपूर्वी तिला पुन्हा दिवस गेले होते. दोन महिन्यांपासून तिच्यावर गर्भपातासाठी दबाव टाकण्यात येत होता. ही थरारक घटना उघडकीस आल्यानंतर रुपालीच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्याबाहेर गोंधळ घालून तिघांना अटक करण्याची मागणी केली.

Web Title: Refuse abortion; The wife got bigger