प्रेमास नकार दिल्याने तृतीयपंथीयाचा आत्महत्त्येचा प्रयत्न
By Admin | Updated: November 15, 2015 23:03 IST2015-11-15T23:02:26+5:302015-11-15T23:03:07+5:30
प्रेमास नकार दिल्याने तृतीयपंथीयाचा आत्महत्त्येचा प्रयत्न

प्रेमास नकार दिल्याने तृतीयपंथीयाचा आत्महत्त्येचा प्रयत्न
नाशिक : प्रेमास नकार दिल्याने एका तृतीयपंथियाने आत्महत्त्येचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी (दि़१४) दुपारच्या सुमारास नाशिकरोड परिसरात घडली़ याबाबत अधिक माहिती अशी की, मूळचा मुंबई व हल्ली नाशिकरोड परिसरात राहणाऱ्या एका ४१ वर्षीय तृतीयपंथीयाचे गोरेवाडी परिसरातील एका युवकावर एकतर्फी प्रेम होते़ मात्र त्याने प्रेमास नकार दिल्याने नैराश्य आलेल्या तृतीयपंथीयाने शनिवारी (दि.१४) दुपारी १२ वाजेच्या सुमारास नाशिकरोड येथील नालंदा लॉजसमोर स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्महत्त्येचा प्रयत्न केला. या जखमी तृतीयपंथीयास उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान, या प्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी तृतीयपंथीयावर आत्महत्त्या करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे़ (प्रतिनिधी)