शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

सोमवारपासून रेल्वे देणार तिकीटाचा परतावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 18:04 IST

कोरोनामुळे गेल्या दोन महिन्यांपासून रेल्वे प्रशासनाकडून सर्व प्रवासी वाहतूक करणाºया रेल्वे रद्द करण्यात आल्या असून, ज्या प्रवाशांनी आॅनलाईन आरक्षण तिकीट घेतले होते. त्यांना आॅनलाईन आरक्षण रद्द केल्यावर त्यांच्या खात्यात

ठळक मुद्देआरक्षण रिफंड देण्याचे काम दररोज सुरू राहणारविशेष रेल्वेमध्ये फक्त तिकीट आरक्षित करणाऱ्यांनाच प्रवास

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेल्या भारतीय रेल्वेने येत्या एक जूनपासून देशात दोनशे श्रमिक रेल्वे चालविण्याचा निर्णय घेवून त्यासाठी आगावू तिकीट बुकींग सुरू केले असून, त्याला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या विशेष रेल्वेमध्ये फक्त तिकीट आरक्षित करणाऱ्यांनाच प्रवास करता येणार असून, त्यातही फक्त परप्रांतिय प्रवाशीच प्रवास करू शकतील. या निमित्ताने रेल्वे आपल्या प्रवाशी वाहतुकीला प्रारंभ करीत असून, त्याच बरोबर दोन महिन्यांपुर्वी तिकीट आरक्षित केलेल्या परंतु रेल्वे रद्द झाल्याने प्रवास न करू शकलेल्या प्रवाशांच्या तिकीटाचे पैसे सोमवारपासून परत करण्यासही सुरूवात होत आहे.

कोरोनामुळे गेल्या दोन महिन्यांपासून रेल्वे प्रशासनाकडून सर्व प्रवासी वाहतूक करणाºया रेल्वे रद्द करण्यात आल्या असून, ज्या प्रवाशांनी आॅनलाईन आरक्षण तिकीट घेतले होते. त्यांना आॅनलाईन आरक्षण रद्द केल्यावर त्यांच्या खात्यात आरक्षण तिकिटाची रक्कम जमा केली आहे. मात्र ज्या प्रवाशांनी आरक्षण केंद्राच्या खिडकी वरून प्रत्यक्ष आरक्षण तिकीट घेतले होते, त्या प्रवाशांना येत्या सोमवार (दि. २५)पासून आरक्षण तिकीट रद्द केल्यानंतर रिफंड देण्यात येणार आहे. मात्र रिफंड घेण्यासाठी प्रवाशांनी एकाच वेळी मोठी गर्दी करू नये असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. आरक्षण रिफंड देण्याचे काम दररोज सुरू राहणार असल्याने प्रवाशांनी खबरदारी घेऊन रिफंड घेण्यास यावे, असे रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, कोविड स्पेशल रेल्वेचे आरक्षण तिकिटाचा कालावधी हा ३० दिवसासाठी आहे. संबंधित रेल्वेचे आरक्षण तिकीट हे वेटिंग लिस्ट मध्ये असेल तर त्या प्रवाशाला रेल्वेमध्ये जाऊ दिले जाणार नाही. त्यामुळे संबंधित रेल्वे प्रवाशाने रेल्वे सुरू होण्यापूर्वीच आपले वेटिंग लिस्टमध्ये असलेले आरक्षण रद्द करून रिफंड घेणे गरजेचे आहे. त्यानंतर मात्र प्रवासी आरक्षण तिकीट रद्द करण्यास गेल्यावर त्यांना रिफंड मिळणार नसल्याचे रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच आॅनलाइन आरक्षण तिकीट घेतलेल्या प्रवाशाचे नाव वेटिंग लिस्ट मध्ये असेल तर त्याने सुद्धा गाडी सुरू होण्यापूर्वीच आपले आरक्षण तिकीट रद्द करणे गरजेचे असल्याचे रेल्वेने कळविले आहे.

सोमवारपासून रेल्वे देणार तिकीटाचा परतावालोकमत न्युज नेटवर्कनाशिक : गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेल्या भारतीय रेल्वेने येत्या एक जूनपासून देशात दोनशे श्रमिक रेल्वे चालविण्याचा निर्णय घेवून त्यासाठी आगावू तिकीट बुकींग सुरू केले असून, त्याला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या विशेष रेल्वेमध्ये फक्त तिकीट आरक्षित करणाऱ्यांनाच प्रवास करता येणार असून, त्यातही फक्त परप्रांतिय प्रवाशीच प्रवास करू शकतील. या निमित्ताने रेल्वे आपल्या प्रवाशी वाहतुकीला प्रारंभ करीत असून, त्याच बरोबर दोन महिन्यांपुर्वी तिकीट आरक्षित केलेल्या परंतु रेल्वे रद्द झाल्याने प्रवास न करू शकलेल्या प्रवाशांच्या तिकीटाचे पैसे सोमवारपासून परत करण्यासही सुरूवात होत आहे.कोरोनामुळे गेल्या दोन महिन्यांपासून रेल्वे प्रशासनाकडून सर्व प्रवासी वाहतूक करणाºया रेल्वे रद्द करण्यात आल्या असून, ज्या प्रवाशांनी आॅनलाईन आरक्षण तिकीट घेतले होते. त्यांना आॅनलाईन आरक्षण रद्द केल्यावर त्यांच्या खात्यात आरक्षण तिकिटाची रक्कम जमा केली आहे. मात्र ज्या प्रवाशांनी आरक्षण केंद्राच्या खिडकी वरून प्रत्यक्ष आरक्षण तिकीट घेतले होते, त्या प्रवाशांना येत्या सोमवार (दि. २५)पासून आरक्षण तिकीट रद्द केल्यानंतर रिफंड देण्यात येणार आहे. मात्र रिफंड घेण्यासाठी प्रवाशांनी एकाच वेळी मोठी गर्दी करू नये असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. आरक्षण रिफंड देण्याचे काम दररोज सुरू राहणार असल्याने प्रवाशांनी खबरदारी घेऊन रिफंड घेण्यास यावे, असे रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, कोविड स्पेशल रेल्वेचे आरक्षण तिकिटाचा कालावधी हा ३० दिवसासाठी आहे. संबंधित रेल्वेचे आरक्षण तिकीट हे वेटिंग लिस्ट मध्ये असेल तर त्या प्रवाशाला रेल्वेमध्ये जाऊ दिले जाणार नाही. त्यामुळे संबंधित रेल्वे प्रवाशाने रेल्वे सुरू होण्यापूर्वीच आपले वेटिंग लिस्टमध्ये असलेले आरक्षण रद्द करून रिफंड घेणे गरजेचे आहे. त्यानंतर मात्र प्रवासी आरक्षण तिकीट रद्द करण्यास गेल्यावर त्यांना रिफंड मिळणार नसल्याचे रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच आॅनलाइन आरक्षण तिकीट घेतलेल्या प्रवाशाचे नाव वेटिंग लिस्ट मध्ये असेल तर त्याने सुद्धा गाडी सुरू होण्यापूर्वीच आपले आरक्षण तिकीट रद्द करणे गरजेचे असल्याचे रेल्वेने कळविले आहे.

टॅग्स :railwayरेल्वेNashikनाशिक