शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

रक्कम मिळणार परत; कोरोनामुळे यंदाची ‘हज’ यात्रा रद्द!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 16:42 IST

दरवर्षी इस्लामी कालगणनेच्या ‘जिलहिज्जा’ महिन्यात पवित्र हज यात्रा सौदी अरेबियामधील मक्का-मदिना येथे पार पडते.

ठळक मुद्देसौदी सरकारकडून घोषणाहज समिती करणार पूर्ण रक्कम परत

नाशिक : कोरोनाचे जगभरात थैमान सुरू असल्याने सौदी अरेबिया सरकारकडून यंदा आंतरराष्ट्रीय 'हज यात्रा२०२०' पुर्णपणे रद्द करण्यात आली आहे. केवळ स्थानिक लोकांना हज यात्रेसाठी परवानगी तेथील सरकारने दिल्याचे भारतीय हज समितीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे ज्या यात्रेकरूंनी हज यात्रेसाठी आगाऊ रक्कम समितीकडे भरली होती, ती सगळी रक्कम कोणत्याही प्रकारची वजावट न करता संबंधित इच्छुक यात्रेकरूंना परत दिली जाणार असल्याचे पत्रक काढले आहे.दरवर्षी इस्लामी कालगणनेच्या ‘जिलहिज्जा’ महिन्यात पवित्र हज यात्रासौदी अरेबियामधील मक्का-मदिना येथे पार पडते. या ठिकाणी जगभरातून लाखोंच्या संख्येने समाजबांधव एकत्र येत हज यात्रा विधीवत पूर्ण करतात. सुमारे सव्वा महिनाभर यात्रेकरू मक्का व मदिनामध्ये मुक्कामी असतात. बकरी ईदचे (ईद-उल-अज्हा) नमाजपठण आटोपल्यानंतर हळुहळु यात्रेकरूंचा परतीचा प्रवास सुरू होतो. इस्लामी संस्कृतीत हज यात्रेला अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त असून धर्माच्या पाच प्रमुख मुलस्तंभांपैकी एक ‘हज’ आहे. प्रत्येक मुस्लीम आपल्या उभ्या आयुष्यात एकदा तरी हज किंवा ‘उमराह’ला जाण्याची आकांक्षा बाळगून असतो.यावर्षी हज यात्रेवर कोरोना या महाभयानक आजाराचे सावट आहे. यामुळे सौदी सरकारने हज यात्रा आंतरराष्ट्रीय स्तरावर न घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. याबाबत भारतीय हज समितीकडून सातत्याने सौदी सरकारकडे पाठपुरावा केला जात होता. नुकतेच समितीने त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द केलेल्या परिपत्रकात आंतरराष्ट्रीय  हज यात्रा-२०२० ही पुर्णपणे सौदी सरकारकडून रद्द करण्यात आल्याचे जाहीर केले आहे.

टॅग्स :NashikनाशिकHaj yatraहज यात्राsaudi arabiaसौदी अरेबियाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस