संदर्भ रुग्णालयात कर्करोगदिनानिमित्त मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2020 04:52 PM2020-02-04T16:52:27+5:302020-02-04T16:54:06+5:30

जागतिक कर्करोगदिनानिमित्त मंगळवारी (दि.४) विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात आहाराबाबत मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. आहातज्ज्ञ रंजिता शर्मा चौबे यांनी यावेळी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.

 Reference Hospital Cancer Day Guidance | संदर्भ रुग्णालयात कर्करोगदिनानिमित्त मार्गदर्शन

संदर्भ रुग्णालयात कर्करोगदिनानिमित्त मार्गदर्शन

Next
ठळक मुद्देविभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात आहाराबाबत मार्गदर्शनपौष्टिक पदार्थांचे प्रदर्शन यावेळी आहारतज्ज्ञांकडून भरविण्यात आले

नाशिक : जागतिक कर्करोगदिनानिमित्त मंगळवारी (दि.४) विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात आहाराबाबत मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. आहातज्ज्ञ रंजिता शर्मा चौबे यांनी यावेळी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
कर्करोगात अतिशय उपयुक्त असलेले व कमी खर्चातील पौष्टिक पदार्थांचे प्रदर्शन यावेळी आहारतज्ज्ञांकडून भरविण्यात आले होते. अ‍ॅन्टीकॅन्सर गुणधर्म असलेले पदार्थ जसे की लिंबू, टॉमॅटो, गाजर, ब्रोकोली, लसुन, तुळशी, हळद आदी पदार्थांचे महत्व रुग्णांना व नातेवाईकांना सांगण्यात आले. तसेच कर्करोग उपचारादरम्यान योग्य अतिप्रथिनयुक्त आहार यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. तसेच प्लास्टिकचा वापर त्याचे दुष्परिणाम, तळलेले पदार्थ, बेकरी पदार्थ, तंबाखु, धुम्रपान याचे आरोग्यावर होणारे विपरित परिणामाबद्दल सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी रुग्णालयातील पाडसे, वाघ आदी उपस्थित होते.

Web Title:  Reference Hospital Cancer Day Guidance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.