आरोग्य -पशुसंवर्धनचा खर्च कमी सीईओंनी घेतला आढावा
By Admin | Updated: March 4, 2015 00:58 IST2015-03-04T00:58:08+5:302015-03-04T00:58:31+5:30
आरोग्य -पशुसंवर्धनचा खर्च कमी सीईओंनी घेतला आढावा

आरोग्य -पशुसंवर्धनचा खर्च कमी सीईओंनी घेतला आढावा
नाशिक : मार्चअखेर जवळ आल्यामुळे जिल्हा परिषदेला प्राप्त झालेल्या निधीच्या खर्चाचा आढावा घेतला असता आरोग्य, कृषी आणि पशुसंवर्धन विभागाचा खर्च सर्वांत कमी झाल्याचे आढळून आल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी या तिन्ही विभागाच्या प्रमुखांना वेळेत खर्च करण्याच्या सूचना केल्या. सुखदेव बनकर यांनी सोमवार व मंगळवार अशा दोन्ही दिवशी जिल्हा परिषदेच्या सर्व खातेप्रमुखांची बैठक घेऊन निधी खर्चाचा आढावा घेतला. जिल्हा परिषदेच्या सुधारित अंदाजपत्रकात तब्बल ११ कोटींनी वाढ अर्थ विभागाने अपेक्षित धरली असून, त्यातून विविध प्रकारच्या योजनाही धरण्यात आल्या आहेत. मात्र नव्यानेच आलेल्या विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार आता मूळ अंदाजपत्रकात जलयुक्त अभियानासाठी एकूण अंदाजपत्रकाच्या दहा टक्के निधी राखीव ठेवण्याचे निर्देश देण्यात आले असून, त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी अंदाजपत्रकात जलयुक्त शिवाय अभियानाच्या कामांसाठी सुमारे पाच कोटींचा निधी राखीव ठेवण्याचे आदेश दिले आहेत. एकूण खर्चाचा आढावा घेतला असता आरोग्य विभागाला नवीन इमारतीच्या बांधकामांसाठी व देखभाल दुरुस्तीसाठी प्राप्त झालेला निधी अत्यल्प खर्च झाल्याचे आढळले. तसेच कृषी व पशुसंवर्धन विभागाकडील काही साहीत्य खरेदीच्या योजनांचे दरकरारच न झाल्याने त्याही विभागांचा निधी अत्यल्प खर्च झाल्याचे आढळले. त्यामुळे सुखदेव बनकर यांनी या तीनही विभागांच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत निधी वेळेत खर्च करण्याचे आदेश दिले. (प्रतिनिधी)