मनमाड : परिसरातील शेतकऱ्यांना लाभदायक ठरलेल्या किसान रेल्वेने महिनाभरात अकराशे टन पौष्टिक आणि प्रतिकारशक्ती वाढवणाºया डाळिंबाची उत्तर भारतात वाहतूक केली आहे. किसान रेल्वेच्या स्वस्त आणि वेगवान वाहतुकीमुळे डाळिंबाची ‘लाली’ उत्तर भारतात जाऊन पोहोचली आहे.किसान रेल्वे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे. नाशवंत माल जसे डाळिंब, शिमला मिरची, फुलकोबी, लिंबू, हिरवी मिरची, आईस्ड-फिश, जिवंत वनस्पती, अंडी आणि इतर भाज्यांची वाहतूक मनमाडसह कोपरगाव, दौंड, नाशिक या भागातून केली जात आहे. किसान रेल्वेने आतापर्यंत वाहून नेलेल्या एकूण नाशवंत मालापैकी ११२७.६७ टन डाळिंबची वाहतूक केली आहे.ज्याचे प्रमाण एकूण नाशवंत मालाच्या सुमारे ६१ टक्के आहे. किसान रेल्वे साप्ताहिक सेवा म्हणून सुरू झाली आणि पुढे मुजफ्फरपूरपर्यंत नेण्यात आली आणि त्यानंतर सांगोला/ पुणे येथून मनमाड येथे लिंक रेल्वे जोडली जात आहे.कृषिमंत्रालयाच्या सहकार्याने रेल्वे मंत्रालयाने सुरू केलेल्या किसान रेल्वेमुळे नाशवंत वस्तूंची वेगवान वाहतूक, नाशवंत वस्तूंची ताजी डिलेव्हरी, मालाच्या संख्येवर बंधन नाही, रस्त्यापेक्षा स्वस्त आणि टोलसह वाहतूक खर्चात बचत करणारी ठरली आहे. रेल्वे मंत्रालयाने सुरु केलेल्या किसान रेल्वेमुळे वाहतुकीच्या इतर पद्धतींच्या तुलनेत वेळ कमी लागत असल्याने शेतकºयांकडून समाधान व्यक्त गेले जात आहे.
डाळिंबाची ‘लाली’ पोहोचली उत्तर भारतात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2020 00:51 IST
मनमाड परिसरातील शेतकऱ्यांना लाभदायक ठरलेल्या किसान रेल्वेने महिनाभरात अकराशे टन पौष्टिक आणि प्रतिकारशक्ती वाढवणाºया डाळिंबाची उत्तर भारतात वाहतूक केली आहे. किसान रेल्वेच्या स्वस्त आणि वेगवान वाहतुकीमुळे डाळिंबाची ‘लाली’ उत्तर भारतात जाऊन पोहोचली आहे.
डाळिंबाची ‘लाली’ पोहोचली उत्तर भारतात
ठळक मुद्देमनमाड : किसान रेल्वेने केली वाहतूक