मागील दाराने रेडीरेकनरच्या दरात वाढ

By Admin | Updated: January 2, 2015 00:41 IST2015-01-02T00:32:40+5:302015-01-02T00:41:35+5:30

घरे महाग होणारच : तळटीपेमधील तरतुदींमुळे वाढणार भुर्दंड; ‘कही खुशी कही गम’चे वातावरण

Redirection rates at the previous door increased | मागील दाराने रेडीरेकनरच्या दरात वाढ

मागील दाराने रेडीरेकनरच्या दरात वाढ

नाशिक : गेल्यावर्षी जमिनीचे सरकारी बाजारमूल्य म्हणजेच रेडीरेकनर अवास्तव असल्याने नव्या वर्षात दरवाढ न करण्याचे आश्वासन काहीसे फोल ठरले आहे. बहुतांशी भागात दरवाढ ‘जैसे थे’ ठेवण्यात आली असले तरी रेडीरेकनरच्या अंमलबजावणीसाठी असलेल्या तळटीप म्हणजे फुटनोटमध्ये काही जाचक तरतुदींचा समाविष्ट असल्याने बांधकाम व्यावसायिक आणि ग्राहकांना आर्थिक भुर्दंड बसणारच आहे. त्यामुळे नव्या वर्षात घर खरेदी महागणार आाहे. क्रेडाईने यासंदर्भात ‘कही खुशी कही गम’ अशी प्रतिक्रिया व्यक्त करताना पुन्हा शासनाकडे दाद मागण्याचा इशारा दिला आहे.
गेल्यावर्षी राज्यशासनाने सरकारी बाजारमूल्याच्या दरात भरमसाठ वाढ केल्याने गृहनिर्माण क्षेत्रावर त्याचा प्रतिकूल परिणाम झाला होता. त्यामुळे नव्या वर्षात तरी दरवाढ करू नये, अशी मागणी बांधकाम व्यावसायिकांच्या क्रेडाई या संस्थेने केली होती. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी दरवाढ न करता नाशिकरांना दिलासा दिला जाईल असे स्पष्ट केले होते. १ जानेवारीस रेडीरेकनरचे दर घोषित होणार असल्याने बांधकाम व्यावसायिकच नव्हे, तर नागरिकांचे लक्ष लागून होते. परंतु नागरिकांना अल्पसा दिलासा मिळाला आहे. मुंबई नाका, सिडकोतील त्रिमूर्ती चौक, पाथर्र्डी मार्ग, मखमलाबाद या भागांत दरवाढ असली तरी आनंदवल्ली, गंगापूररोडसारख्या भागांना वगळण्यात आले आहे. क्रेडाईच्या वतीने यासंदर्भात भूमिका स्पष्ट करताना अध्यक्ष जयेश ठक्कर आणि अविनाश शिरोडे यांनी सांगितले की, गेल्यावर्षी अवास्तव दरवाढ करण्यात आल्यानंतर आता यावर्षी कॉलेजरोड गंगापूररोड, आनंदवल्लीसह अन्य अनेक भागांत दरवाढ झालेली नाही. गेल्यावर्षीचे दर यंदा कायम असल्याने जैसे थे परिस्थिती आहे. शहरातील सर्व आमदार आणि महसूल मंत्र्यांचे आभार मानतो; परंतु त्यातून दिलासा मिळणार नाही, अशी व्यवस्था अधिकाऱ्यांनी केली आहे. गेल्यावर्षी जे तीस ते चाळीस टक्के दरवाढ शासनाने केली होती. तितकी वास्तविक किंमत होण्यासाठी दोन ते तीन वर्षे प्रतीक्षा करावी लागणार आहे. साहजिकच तोपर्यंत चढ्या दराने घर खरेदी करावे लागणार आहे. याशिवाय गेल्यावर्षी फुटनोटमधील तरतुदींमुळे गोेंधळ उडाला होता.

Web Title: Redirection rates at the previous door increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.