आवक घटल्याने लाल कांदा भावाने घेतली उसळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:16 IST2021-02-13T04:16:17+5:302021-02-13T04:16:17+5:30
कोट - सध्या देशांतर्गत कांद्याला चांगली मागणी आहे. त्या तुलनेत आवक खूपच कमी झाली आहे. अवेळी आलेल्या पावसामुळे लाल ...

आवक घटल्याने लाल कांदा भावाने घेतली उसळी
कोट -
सध्या देशांतर्गत कांद्याला चांगली मागणी आहे. त्या तुलनेत आवक खूपच कमी झाली आहे. अवेळी आलेल्या पावसामुळे लाल कांद्याच नुकसान झाले आहे यामुळे सध्या लाल कांद्याला चांगला दर मिळत आहे. येत्या १५ मार्चपर्यंत ही स्थिती कायक राहाण्याचा अंदाज आहे. - सतीष जैन , कांदा व्यापारी, लासलगाव
कोट -
गतवर्षी जिल्ह्यात ५५ हजार हेक्टरवर कांद्याची लागवड झाली होती. यावर्षी त्यात वाढ होऊन ती ७७ हजार हेक्टरपर्यंत गेली आहे. लागवडीत वाढ झाली असली तरी अवेळी पाऊस , नैसर्गिक आपत्ती यामुळे कांद्याचे उत्पादन घटले आहे. शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन झालेले नाही. यामुळे त्याचा कांदा भावावर परिणाम झाला आहे. - कैलास शिरसाट, कृषी उपसंचालक नाशिक