पुन्हा एकदा लाल दिव्याची हुलकावणी !
By Admin | Updated: March 23, 2017 22:35 IST2017-03-23T22:34:54+5:302017-03-23T22:35:10+5:30
ओझर गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत ेलाल दिवा हुकलेल्या मंदाकिनी बनकर यांना यंदाही आलेली संधी हुकली.

पुन्हा एकदा लाल दिव्याची हुलकावणी !
सुदर्शन सारडा ओझर
गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत ेलाल दिवा हुकलेल्या मंदाकिनी बनकर यांना यंदाही आलेली संधी हुकली. यामुळे पिंपळगावला लाल दिवा येण्याची संधी सलग दुसऱ्यांदा हुकली असली असल्याची चर्चा ओझर-पिंपळगाव परिसरात रंगली आहे.
राजकारणामध्ये एखादा सामना खेळण्याची वेळ आली की गनिमी कावा, धूर्त खेळी, डोक्यावर बर्फ ठेवून समोरच्याचा काटा काढणे इत्यादि सर्व वाक्य सध्या कानी पडतात. परंतु नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणुकीत याचा शंभरटक्के प्रत्यय आला असल्याचे जाणकारांचे मत
आहे.
जिल्ह्याचा कौल हाती आला तेव्हा शिवसेना सर्वाधिक २५ जागा जिंकून प्रथम क्रमांकावर होती. त्यामुळे साहजिकच यंदा काहीसुद्धा झाले तरी जिल्हा परिषदेवर , भगवा फडकलाच पाहिजे असा चंग जिह्यातील सेनेच्या नेत्यांनी बांधला होता. याचाच प्रत्यय म्हणून सिन्नरच्या शीतल सांगळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष झाल्या. तर काँग्रेसच्या नयना गावित या उपाध्यक्ष झाल्या. निकालानंतरच्या काळात विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू असल्याने दादा भुसे, अनिल कदम, राजाभाऊ वाजे हे मुंबईत होते.एकीकडे काही झालेल्या गुप्तबैठकांमध्ये अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना युतीचे संकेत दिले असल्याचे ेसांगितले जात होते. परंतु दिलीप बनकर यांच्या राजकीय भविष्य उज्ज्वल होण्यासाठी कुठल्याही परिस्थितीत पिंपळगावला लाल दिवा आणायचा होता. बनकर यांना लालदिवा मिळाला तर अनिल कदम यांना राजकीय कारकिर्दीत भविष्यात अडथळा निर्माण होणार होता. अशा परिस्थितीत बहुमतासाठी ३ सदस्यांची कमी भासत असताना शिवसेनेच्या काही शिलेदारांनी प्रयत्नांची
शिकस्त केली. यात अनील
कदम यांची भूमिका महत्त्वाची
ठरली.
पालकमंत्री गिरीश महाजन आणि पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी बहुमताचा आकडा गाठण्यासाठी जुळवाजुळव केल्याची चर्चा आहे. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये दादा भुसे, अनिल कदम, राजाभाऊ वाजे, सुहास कांदे भाऊलाल तांबडे हे खरे बिनीचे सरदार ठरले असल्याचे मत व्यक्त होत
आहे.
गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत ेलाल दिवा हुकलेल्या मंदाकिनी बनकर यांना यंदाही आलेली संधी हुकली असेच काहीसे चित्र आहे. परंतु माकपा गटनेते रमेश
बरफ यांनी घेतलेली तटस्थची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली. दिलीप बनकर यांनी सर्व स्तरावरील नेत्यांची भेट घेतली, तर अजित पवार यांनी भाजपासोबत न जाता सेनेबरोबर जा असा अनुभवी सल्लादेखील त्यांना दिला असल्याचे बोलले जात आहे. एक दोन नेते वगळता राष्ट्रवादीच्या अंतर्गत विरोधालादेखील त्यांना सामोरं जावं लागल्याची चर्चा आहे.