फेरनिविदा काढण्याची सूचना
By Admin | Updated: October 9, 2015 00:22 IST2015-10-09T00:21:52+5:302015-10-09T00:22:32+5:30
फेरनिविदा काढण्याची सूचना

फेरनिविदा काढण्याची सूचना
नाशिक : महापालिका स्थायी समिती आणि आयुक्त यांच्यातील संघर्ष पेटला असतानाच नाशिक दौऱ्यावर आलेले पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत गुरुवारी आयुक्त व स्थायी समितीच्या सदस्यांची बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात झाली. यावेळी पेस्ट कंट्रोलसंबंधी स्थायीने केलेला ठराव विखंडित न करता नव्याने फेरनिविदा काढण्याची सूचना पालकमंत्र्यांनी केली. गेल्या तीन महिन्यांपासून साधुग्राम स्वच्छतेच्या ठेक्यावरून प्रशासन विरुद्ध स्थायी समिती असे वातावरण निर्माण झाल्याने बुधवारी स्थायीच्या सदस्यांनी मुंबईला धाव घेत पालकमंत्र्यांशी चर्चा केली होती व गुरुवारी भेटण्याचे ठरले होते. त्यानुसार, विभागीय आयुक्त कार्यालयात स्थायी समितीचे सभापती शिवाजी चुंभळे व स्थायीचे सदस्य, पालकमंत्री गिरीश महाजन, आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम आणि आमदार बाळासाहेब सानप यांच्या उपस्थितीत बैठक झाली. दरम्यान, पेस्ट कंट्रोलच्या प्रस्तावावरही चर्चा होऊन नव्याने फेरनिविदा काढण्याचे आयुक्तांना सूचित करण्यात आले. (प्रतिनिधी)