औषधनिर्माण अधिकारी भरती सोमवारी
By Admin | Updated: July 28, 2014 00:56 IST2014-07-27T00:58:56+5:302014-07-28T00:56:11+5:30
औषधनिर्माण अधिकारी भरती सोमवारी

औषधनिर्माण अधिकारी भरती सोमवारी
नाशिक : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत कंत्राटी औषधनिर्माण अधिकारीपदाची स्थगित करण्यात आलेली भरतीप्रक्रिया सोमवारी (दि.२८) होणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ एकनाथ माले यांनी दिली़
कंत्राटी औषधनिर्माण अधिकारी या १४ पदांसाठी परिचारिकांच्या भरतीप्रक्रियेसह ही भरतीप्रक्रिया सुरू करण्यात आली होती़ परंतु परिचारिकांच्या चार जागासांठी साडेपाचशे उमेदवार हजर राहिल्याने गोंधळ उडाला होता़ यंत्रणा अपूर्ण पडल्याने औषधनिर्माण अधिकारी पदाचे अर्ज स्वीकारण्यात आले; परंतु त्यांच्या मुलाखती न घेता ही प्रक्रिया स्थगित ठेवण्यात आली होती. परिचारिकांच्या प्रक्रियेत गोंधळ झाल्याने तीही भरतीप्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे़ औषधनिर्माण अधिकारीपदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांच्या अर्जांची छाननी करून पात्र उमेदवारांची यादी मुलाखतीच्या ठिकाणी लावण्यात आली आहे़ १४ जागांसाठी एकास पाच याप्रमाणे गुणानुक्रमे ७० पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येऊन अंतिम निवड करण्यात येणार आहे़ २८ जुलैला उपस्थित राहण्याचे आवाहन माले यांनी केले आहे़ (प्रतिनिधी)