शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
4
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
5
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
6
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
7
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
8
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
9
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
10
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
11
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
12
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
13
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
15
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
16
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
17
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
18
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
19
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
20
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक

महापालिकेत ५५ वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 01:24 IST

नाशिक - शहरात कोरोनाचे संकट वाढल्याने महापालिकेने वैद्यकीय मनुष्यबळ वाढविण्याचे काम सुरू केले असून, २५  एमबीबीएस पदवीधारक  २५  तर ...

ठळक मुद्देकोरोनाशी लढा: आजपासून मुलाखतींचे सत्र

नाशिक - शहरात कोरोनाचे संकट वाढल्याने महापालिकेने वैद्यकीय मनुष्यबळ वाढविण्याचे काम सुरू केले असून, २५  एमबीबीएस पदवीधारक  २५  तर ३०  बीएएमएस वैद्यकीय भरणार आहे. याशिवाय एकूण  २०९  पदे तातडीने भरण्याची तयारी करण्यात आली आहे.कोरोनाचे संकट आल्यानंतर महापालिकेच्या यंत्रणेची बरीच दमछाक झाली होती. राष्ट्रीय आरोग्य मिशन तसेच जिल्हा शासकीय रुग्णालयामार्फत तात्पुरत्या स्वरूपात वैद्यकीय अधिकारी, नर्स आणि अन्य कर्मचारी घेण्यात आले. तीन तीन महिने मुदतवाढ दिल्यानंतर गेल्या ३१ जानेवारीस सर्वांची तात्पुरती सेवाही खंडित करण्यात आली. नंतर आता फेब्रुवारीत कोरोना वाढत असल्याचे दिसू लागल्यानंतर मनुष्यबळ वाढविण्यासाठी महापालिकेने प्रयत्न सुरू केले आणि १ मार्चपासून २७६ कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली आहे. खरे तर ५०० जणांच्या भरतीसाठी तयारी करण्यात आली. परंतु काही उमेदवार रुजू न झाल्याने आता पुन्हा मोहीम राबविण्यात येणार आहे. तसेच बिटको रुग्णालयात कार्यान्वित केल्या जाणाऱ्या कोरोना प्रयोगशाळेसाठी तंत्रज्ञांची थेट मुलाखतीद्वारे तात्पुरती भरती केली जाणार आहे. २५ एमबीबीएस आणि ३० बीएएमएस डॉक्टर्सचीही भरती करण्यात येणार आहे. एमबीबीएस डॉक्टरांना मासिक मानधन ७५ हजार रुपये तर बीएएएमएस डॉक्टरांना ४०  हजार रुपये देण्यात येणार आहे.

महापालिकेत आजपासून (दि. २३) मुलाखतीची प्रक्रिया सुरू होणारएमडी मायक्रोबायोलॉजी दोन पदे असून, प्रत्येकी एक लाख रुपये मानधन देण्यात येणार आहे. एमएस्सी मायक्रोबायोलॉजीची चार पदे असून, प्रत्येकी ३० हजार रुपये मानधन असेल. प्रयोगशाळा तंत्रज्ञ ३० असून, त्यांना प्रत्येकी १७ हजार रुपये, परिचारिका ५० जागा असून, त्यासाठी १७ हजार रुपये, एएनएम ६० जागा असून, प्रत्येकी १५ हजार आणि डाटा एन्ट्री ऑपरेटरची आठ पदे असून, १५ हजार रुपये याप्रमाणे मानधन दिले जाणार आहे.शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. त्यातच नाशिकरोड येथील ७०० रुग्णांची व्यवस्था आहे. याशिवाय याच रुग्णालयात एमआरआय, सीटी स्कॅन यंत्रासाठी आवश्यक ते मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी पदे भरण्यात येणार आहेत. याठिकाणी असलेली कोविड लॅब सुरू करण्यासाठीदेखील मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याठिकाणी रविवारी (दि.२१) सामग्री दाखल झाली असून, येत्या दोन दिवसात चाचणी करण्यात येणार आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाhospitalहॉस्पिटल