शहरं
Join us  
Trending Stories
1
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
2
पालघरची जागा भाजपने घेतली; शिंदेंना धक्का, नाशिकचे ठरवा...; बावनकुळे-भुजबळांचा स्पष्ट संदेश
3
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
4
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
5
T20 World Cup: बलाढ्य ऑस्ट्रेलियाने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्या खेळाडूला मात्र डच्चू
6
दिल्लीत काँग्रेसला धक्का! आधी लवली यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडले, आता दोन माजी आमदारांचा राजीनामा 
7
'तुम्ही मनापासून त्यांना देव मानतच नव्हता'; दानवेंचा अजितदादांना टोला
8
Rule Change: LPG सिलिंडरच्या दरापासून ते क्रेडिट कार्ड बिल पेमेंटपर्यंत; आजपासून झाले 'हे' ५ मोठे बदल
9
"होय, छगन भुजबळांचा नावाचा प्रस्ताव होता पण तडजोडीत ही जागा शिवसेनेला गेली"
10
दिल्ली, नोएडात खळबळ! एकाचवेळी ५० शाळांना बॉम्ब ठेवल्याचे मेल; विद्यार्थ्यांना सोडले
11
ठाणे, कल्याणमध्ये शिंदेंचे उमेदवार जाहीर; नरेश म्हस्केंना उमेदवारी, नाशिक अद्याप गुलदस्त्यातच
12
'एकेकाळी मी शरद पवारांना दैवत मानायचो, आता मी वेगळा मार्ग स्वीकारला आहे', अजित पवार यांचं विधान
13
Fact Check : राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला?; जाणून घ्या 'त्या' व्हायरल Video मागचं 'सत्य'
14
Fact Check: राहुल गांधींना अमेठीतून, तर प्रियंका गांधींना रायबरेलीतून उमेदवारी दिल्याचं ते पत्र खोटं; जाणून घ्या सत्य
15
माझं सत्त्व, माझं तत्त्व आणि सर्वस्व 'महाराष्ट्रधर्म', महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंची पोस्ट!
16
'सगळं माहिती असताना मोदींनी प्रज्ज्वल रेवन्नासाठी मतं मागितली'; ओवेसींचा आरोप
17
AI च्या माध्यमातून लक्ष्मीकांत बेर्डे परत येणार? महेश कोठारे करणार हा भन्नाट प्रयोग
18
Akhilesh Yadav : "कोरोना लसीवरून वाद, लोकांना येतोय हार्ट अटॅक"; अखिलेश यादव यांचं भाजपावर टीकास्त्र
19
Wipro च्या नव्या सीईओंना किती वेतन मिळणार माहितीये? त्यात येतील दोन प्रायव्हेट जेट!
20
नाशिकमध्ये ठाकरे गटात बंड होणार! एक नेता दीड वर्षापासून तयारी करतोय, अर्ज घेतला

पुन्हा ३०० सफाई कामगार भरतीचा घाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 1:21 AM

शहरात कोरोनामुळे संकट उद्भवले असताना त्याचे निमित्त करून मोठे अर्थकारण महापालिकेत सुरू झाले आहे. महापालिकेच्या रुग्णालयात सफाईसाठी कामगार कमी पडत असल्याचे निमित्त करून एका अधिकाऱ्याने ३०० सफाई कामगार आऊट सोर्सिंगने घेण्याचा घाट घातला आहे.

ठळक मुद्देकोरोनाचे निमित्त : महापालिका विनानिविदा भरती करणार

नाशिक : शहरात कोरोनामुळे संकट उद्भवले असताना त्याचे निमित्त करून मोठे अर्थकारण महापालिकेत सुरू झाले आहे. महापालिकेच्या रुग्णालयात सफाईसाठी कामगार कमी पडत असल्याचे निमित्त करून एका अधिकाऱ्याने ३०० सफाई कामगार आऊट सोर्सिंगने घेण्याचा घाट घातला आहे. विशेष म्हणजे हे काम अत्यंत आवश्यक असल्याचे निमित्त करून विनानिविदा जुन्याच ठेकेदारांकडून काम करून घेण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्याने घेतली आहे. कोरोनाचे संकट असल्याने सध्या प्रशासनाला व्यापक अधिकार प्राप्त आहेत. त्यातच कोरोनाचे संकट अधिक गडद होत असल्याने काही मोजके लोकप्रतिनिधी वगळता अन्य कोणीही खरेदी, निविदांच्या घोळात नाहीत. हीच संधी घेऊन आता वेगवेगळे प्रकार सुरू झाले आहेत. गेल्या सोमवारी झालेल्या खातेप्रमुखांच्या बैठकीत एका अधिकाऱ्याने आता रुग्णालय स्वच्छतेसाठी सफाई कामगार कमी पडत असून, तातडीने ३०० सफाई कामगार घेण्याची गरज असल्याचे सांगितले आहे. त्यानुसार आता सध्या ठेकेदाराकडून ७०० कामगार आउटसोर्सिंगने घेण्यात आले. त्याच ठेकेदाराकडून आणखी ३०० कामगार घेऊन त्यांच्यामार्फत रुग्णालयांच्या सफाईचा घाट घातला जात आहे. मुळातच महापालिकेतील आऊटसोर्सिंगचा ठेका वादग्रस्त असून, मात्र, त्यानंतरही त्याच ठेकेदाराकडून ३०० सफाई कामगार घेण्याच्या प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्याच्या भूमिकेमुळे शंकेचे वातावरण निर्माण झाले आहे.कंत्राटी पद्धतीने का नाही?महापालिकेत सध्या वैद्यकीय विभागासाठी डॉक्टर, नर्स, परिचारिका, आया, वॉर्डबॉय हे सर्वच तीन महिन्यांच्या कंत्राटावर घेतले जात आहेत. मग तीन महिने कालावधीसाठी याच पद्धतीने ३०० सफाई कामगारदेखील वॉक इन इंटरव्ह्यूतून घेता येऊ शकतात. तसेच तीन महिने कालावधीसाठी घेतल्यामुळे अन्य दायित्व महापालिकेवर राहणार नाही. असे असताना आता एकाच ठेकेदाराकडून भरतीचा अट्टाहास कशासाठी असादेखील प्रश्न निर्माण झाला आहे. 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाEmployeeकर्मचारी