हवामान खात्यात ११०० पदांची भरती : मराठी युवकांना संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 22:23 IST2017-08-06T22:17:35+5:302017-08-06T22:23:57+5:30

दिवसेंदिवस महत्त्वाच्या होत चालेल्या हवामान खात्यात वैज्ञानिक सहायक पदासाठी तब्बल ११०२ जागा भरण्यात येणार असून, त्यासाठी राज्यातील हवामान खात्यातील संघटनांनी मराठी युवकांचा सहभाग वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत.

Recruitment of 1100 posts in the Meteorological Department: Opportunities for Marathi youth | हवामान खात्यात ११०० पदांची भरती : मराठी युवकांना संधी

हवामान खात्यात ११०० पदांची भरती : मराठी युवकांना संधी

ठळक मुद्देवैज्ञानिक सहायक पदासाठी विज्ञानातील भौतिक शास्त्र पदवीधर (बीएस्सी प्रथमश्रेणी) वैज्ञानिक सहायक पदासाठी तब्बल ११०२ जागा यापूर्वी खात्यामार्फत साडेचारशे पदांची भरती झाली

नाशिक : दिवसेंदिवस महत्त्वाच्या होत चालेल्या हवामान खात्यात वैज्ञानिक सहायक पदासाठी तब्बल ११०२ जागा भरण्यात येणार असून, त्यासाठी राज्यातील हवामान खात्यातील संघटनांनी मराठी युवकांचा सहभाग वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. यापूर्वी खात्यामार्फत साडेचारशे पदांची भरती झाली होती, त्यावेळी एकही मराठी युवक निवडला गेला नव्हता. त्या पार्श्वभूमीवर खात्यातील संघटनांनी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
देशात सध्या हवामान खाते महत्त्वाचे ठरले आहे. देशभरात सात प्रादेशिक हवामान केंद्राच्या अखत्यारीत एकूण आठशेवर कार्यालय आहेत. या कार्यालयांमध्येच आता ११०२ पदे भरली जाणार आहेत. त्यासाठी या आधी ४ आॅगस्ट ही आॅनलाइन अर्जासाठी अंतिम मुदत होती, मात्र आता ती वाढवून १४ आॅगस्ट अशी करण्यात आली आहे. वैज्ञानिक सहायक पदासाठी विज्ञानातील भौतिक शास्त्र पदवीधर (बीएस्सी प्रथमश्रेणी) या शैक्षणिक पात्रतेवर आधारित आहे. तथापि, यापूर्वीच्या अनुभवावरून एम एस्सी, बी. टेक. बी. ई. उमेदवार मोठ्या प्रमाणात परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. सध्या भरावयाच्या पदांसंदर्भात स्टाफ सिलेक्शनच्या एसएससी.निक या लिंकवर सविस्तर माहिती देण्यात आली आहे. सदरच्या पदासाठी आॅनलाइन अर्ज केल्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांना आॅन जॉब ट्रेनिंग दिले जाते. हवामानविषयक उपकरणे व साधने वापरण्याचे तंत्रज्ञान दिले जाते. स्थानिक लोकाधिकार समिती व काही संघटना या भरतीत सहभागी होण्यासाठी मराठी युवकांना मार्गदर्शन करण्यास तयार असून, अधिक माहितीसाठी राजेश तांबे, प्रादेशिक सचिव, मुंबई तसेच, यशवंत साटम, सरचिटणीस, स्थानिक लोकाधिकार समिती, कुलाबा वेधशाळा, मुंबई येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Recruitment of 1100 posts in the Meteorological Department: Opportunities for Marathi youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.